Pune Crime News: पुणे जिल्ह्यात सिनेस्टाईल खूनाचा थरार! आधी झोपेतच भावजयीची निर्घृण हत्या; पळून जाताना त्याचाही गेला जीव

Pune Crime News: हल्ल्यामध्ये भावजयीचा मृत्यू झाल्याने परदेशात जाण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले आहे.. या सिने स्टाईल हत्येच्या थराराने संपूर्ण पुणे जिल्हा हादरून गेला आहे...
Shirur Police Station
Shirur Police StationSaamtv

Pune News: पुणे (Pune) जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि भयंकर हत्येची घटना समोर आली आहे. पुण्याच्या शिरुर तालुक्यातील आंबळे येथे कौटुंबिक वादातुन सावत्र भावाने आपल्या भावावर आणि भावजयीवर चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. ज्यामध्ये भावजयी प्रिंयाका सुनिल ब्रेंद्रे (वय 27) या जागीच ठार झाल्या आहेत. तर भाऊ सुनिल (वय 30) गंभीर जखमी झाला.

धक्कादायक बाब म्हणजे हल्ला केल्यानंतर स्वतचा अपघात झाल्याचा बनाव केल्याचेही समोर आले आहे. ज्यामध्ये आरोपीचाही मृत्यू झाला. या भयंकर घटनेने पुणे जिल्हा हादरुन गेला आहे. (Latest Marathi News)

Shirur Police Station
Paithan Crime News: पैठण हादरलं! नवऱ्याचं अपघाती निधन; तेराव्याच्या दिवशीच दिराचं वहिनीसोबत भयानक कृत्य

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, उच्चशिक्षित बेंद्रे कुटुंबात आई वडिल आणि एक सावत्र भाऊ, भावजयी असा परिवार होता. यामधील आरोपी अनिल याला काम मिळत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून कुटुंबात वाद सुरु होते. परिवारातील थोरला मुलगा सुनिल व सून प्रियांका पुण्यामध्ये आयटी कंपनीत कामाला आहेत. 1 मे रोजी ते जॉबसाठी परदेशात जाणार होते. तर दुसऱ्या मुलाचा जॉब गेल्याने तो वैफल्यग्रस्त झाला होता. यामुळेच त्यांच्या कुटूंबात वाद सुरू होते.

Shirur Police Station
Nagpur Crime News: नागपूर हादरले! पतीकडून पत्नीची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या; धक्कादायक कारण समोर...

घटनेच्या दिवशी प्रियांका व सुनील हे घराच्या टेरेस वरती झोपले होते. याचवेळी आरोपी अनिलने दोघांवर जोरदार चाकूहल्ला केला. ज्यामध्ये भावजय गंभीर जखमी झाल्याने मोठ्या प्रमाणात वार केल्यामुळे प्रियांकाचा जागीच मृत्यू झाला, तर सुनील याला पुणे येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरुन दुचाकीवरुन पळुन जात असताना रस्त्यात एका कारला दुचाकीची धडक दिली आणि स्वतचा अपघात करुन घेतला. यामध्ये आरोपी अनिल बेंद्रेचाही मृत्यु झाला. (Crime News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com