Nagpur Crime News: नागपूर हादरले! पतीकडून पत्नीची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या; धक्कादायक कारण समोर...

Nagpur News Update: या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
Nagpur Crime News
Nagpur Crime NewsSaam TV

Nagpur News: गेल्या काही दिवसांपासून नागपूर (Nagpur) शहरातील गुन्हेगारी वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असतानाच नागपूरमध्ये आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

कौटुंबिक वादातून पतीनेच पत्नीच्या डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. शैलजा नागपुरे असं मृत पत्नीचे नाव असून आरोपी बाबाराव नागपुरे याला पोलिसांनी अटक केली आहे. या भयंकर घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. (Latest Marathi News)

Nagpur Crime News
Mahadevrao Mahadik On Satej Patil : मी शेलारमामा, आलते शड्डू मारायला शिकवायला...फूकून उडवून टाकेन; महादेवराव महाडिकांचा सतेज पाटलांना टाेला

याबाबत अधिक माहिती अशी की, याबाबत अधिक माहिती अशी की, घटनेतील आरोपी बाबाराव नागपुरे (वय, ५६) हे नागपूरच्या बेलतरोडी पोलीस स्टेशन अंतर्गत राहत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची दुसरी पत्नी शैलजा नागपुरे हिच्यासोबत बाबाराव यांचा वाद सुरू होता. आज सकाळी बाबाराव त्यांच्या शिवणगाव पुनर्वसन येथील प्लॉट वर आले होते.

थोड्यावेळाने त्यांची पत्नी शैलजा देखील प्लॅटवर आल्या. यावेळी संपत्तीच्या वादावरून दोघात भांडण सुरू झाले. बघता बघता हा वाद विकोपाला गेला व झटापटीत बाबाराव यांनी पत्नीच्या डोक्यावर दगडाने वार केला.

Nagpur Crime News
Nagpur Devendra Fadnavis Banner: देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होणार; नागपुरातील बॅनरची राज्यभरात चर्चा

या हल्ल्यात पत्नी शैलजाचा जागीच मृत्यू झाला. यावेळी स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती दिल्यावर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत. या भयंकर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Crime News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com