Nagpur Devendra Fadnavis Banner: देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होणार; नागपुरातील बॅनरची राज्यभरात चर्चा

Devendra Fadnavis Upcoming CM Nagpur Posters : राज्यात सत्तांतर झाल्यापासून मुख्यमंत्री पदावर भाजपकडून सातत्याने दावा सांगितला जात आहे.
Devendra Fadnavis Upcoming CM Nagpur Posters
Devendra Fadnavis Upcoming CM Nagpur PostersSaam TV

Devendra Fadnavis Upcoming CM Nagpur Posters : राज्यात सत्तांतर झाल्यापासून मुख्यमंत्री पदावर भाजपकडून सातत्याने दावा सांगितला जात आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून आमचे खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहे, असं वारंवार सांगण्यात येत आहे.

एकीकडे राधाकृष्ण विखे पाटील यांनी फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं विधान केलं असताना दुसरीकडे आता नागपूरमध्येही देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होणार, अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत. (Latest Marathi News)

Devendra Fadnavis Upcoming CM Nagpur Posters
Ajit Pawar News: 'त्या' सभ्यतेची पातळी मी कधीही ओलांडणार नाही; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

नागपूर शहरातील बुटीबोरी परिसरात ठिकठिकाणी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होणार, अशा आशयाचे होर्डिंग्ज लागल्याचं दिसून येत आहे. बुटीबोरी नगर परिषदेचे अध्यक्ष बबलू गौतम यांनी लावले होर्डिंग्ज सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण विविध कारणांनी चांगलंच ढवळून निघालं आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय लवकरच येणार आणि राज्यातील शिंदे-भाजप सरकार कोसळणार अशा चर्चा सुरू आहे. इतकंच नाही तर, अजित पवार हे भाजपसोबत जातील आणि मुख्यमंत्री होतील, अशा चर्चाही सुरू आहे. (Breaking Marathi News)

त्यामागचं कारणंही तसंच आहे. अजित पवारांनी सकाळ माध्यम समुहाला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला होता. तुम्हाला २०२४ ला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना २०२४ काय आताही व्हायला तयार आहे, असं  अजित पवारांनी (Ajit Pawar) म्हटलं होतं.

दरम्यान, अजित पवारांच्या या दाव्यानंतर ते लवकरच भाजपसोबत जाणार अशा चर्चा सुरू झाल्या. मात्र, मी राष्ट्रवादी सोडून कुठेही जाणार नाही, या चर्चांमध्ये काही तथ्य नाही, मला विनाकारण बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जातंय, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं होतं.

Devendra Fadnavis Upcoming CM Nagpur Posters
Ajit Pawar On Barsu Refinery Protest: संवादातून मार्ग निघेपर्यंत सर्वेक्षण थांबवावं; अजित पवारांचं सरकारला आवाहन

अजित पवारांच्या सासूरवाडीत झळकले मुख्यमंत्रीपदाचे बॅनर

दुसरीकडे राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार हे मुख्यमंत्री होणार या चर्चेला सध्या उधाण आलं आहे. यातच अजित पवार यांची सासरवाडी म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील तेर गावा मध्ये अजित पवार मुख्यमंत्री होणार असे बॅनर लावण्यात आले आहेत. शहरातील चौका चौकात तेरचे जावई ,आमचे नेते, जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजित पवार अश्या आशयाचे बॅनर लावण्यात आलेत. (Breaking Marathi News)

तसेच अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून त्यांच्या सासरवाडीच्या लोकांनी संत गोरोबा काकांना साकडे घातले आहे. आज सकाळी संत गोरोबा काकांच्या मंदिरात विधिवत पूजा करण्यात आली. अजित पवार यांच्या सासरवाडीत झळकलेल्या या पोस्टरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

दरम्यान, एकीकडे राज्यात अजित पवार हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होणार अशी चर्चा रंगली असतानाच आता दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होतील, अशा आशयाचे बॅनर नागपुरात लागले आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय परिस्थितीत येणाऱ्या दिवसांत काय होईल, याचा अंदाज बांधणे कठीण आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com