Ajit Pawar News: 'त्या' सभ्यतेची पातळी मी कधीही ओलांडणार नाही; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Ajit Pawar Latest News: माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून जाणार नाही, या आपल्या विधानाचा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पुनरुच्चार केला
Ajit Pawar News
Ajit Pawar Newssaam tv

Ajit Pawar Latest News: माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून जाणार नाही, या आपल्या विधानाचा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पुनरुच्चार केला. आज बारामतीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी हा पुनरुच्चार केला. (Latest Marathi News)

Ajit Pawar News
Sharad Pawar On Barsu Refinery Protest: 'सर्वे थांबवा, प्रोजेक्ट अडचणीत येईल...' बारसू रिफायनरी संदर्भात शरद पवारांची उदय सामंत यांच्याशी चर्चा

काय म्हणाले अजित पवार?

बारामतीच्या विकासासाठी मी कायमस्वरूपी कटिबद्ध आहे, माझ्याबाबत विनाकारण संशय निर्माण करणारे, अफवा पसरवणारे वातावरण तयार केले जात असून माझी जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे, अशा बातम्यांकडे बारामतीकरांनी लक्ष देऊ नये, अजित पवार आणि बारामती हे अतूट समीकरण असून मी कायम बारामतीच्या विकासासाठी वचनबद्ध असेल अशी ग्वाही देखील अजित पवार यांनी आज दिली. (Breaking Marathi News)

'माझी विनाकारण बदनामी करण्यात आली'

गेल्या काही दिवसात अजित पवार यांच्या विषयी माध्यमातून आलेल्या बातम्याविषयी बोलताना अजित पवार यांनी या सर्व प्रकरणात आपली बदनामी झाल्याची खंत बोलून दाखवली. नॉट रिचेबल हा प्रकार अवघड आहे, असे सांगत अजित पवार यांच्यावर एवढं प्रेम का उतू चाललंय हेच समजत नाही, असेही ते म्हणाले.

'त्या सभ्यतेची पातळी मी कधीही ओलांडणार नाही'

"विरोधकांच्या बाबतीत मी सॉफ्ट असतो आणि टीका करीत नाही हा आरोप देखील मला मान्य नाही असे सांगत पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणाला एक सभ्य व सुसंस्कृतपणा असून त्या सभ्यतेची पातळी मी कधीही ओलांडणार नाही", असंही अजित पवारांनी ठामपणे सांगितलं. (Maharashtra Political News)

Ajit Pawar News
Gulabrao Patil News: ...तर मी एका मिनिटातच राजीनामा देईन; गुलाबराव पाटील असं का म्हणाले?

'...असा विरोध मला कदापि मान्य नाही'

"संसदीय आयुधांचा वापर करून विरोधक व सरकारला धारेवर धरण्याचे काम अधिवेशनाच्या काळात मी केले आहे, मात्र एकमेकांवर खुर्च्या भिरकाविणे, अंगावर धावून जाणे, अयोग्य शब्दांचा वापर करणे, विधिमंडळात कागदे भिरकावणे याला तीव्र विरोध म्हणत असतील तर असा विरोध मला कदापीही मान्य होणार नाही", असंही अजित पवारांनी (Ajit Pawar) स्पष्ट केलं.

"आपल्याबद्दल आलेल्या बातम्यांबाबत बोलताना एखाद्याच्या मागे किती हात धुऊन लागावे याला पण काही मर्यादा असतात, त्या मर्यादा पाळल्या गेल्या नाहीत, अशी नाराजीही त्यांनी बोलून दाखविली. काहीही झाले की अजित पवार नॉट रिचेबल आहे, अशा पद्धतीच्या बातम्या माध्यमातून येतात आणि त्याचा विपर्यास केला जातो, मात्र बारामतीकरांना मी सांगू इच्छितो की शेवटच्या क्षणापर्यंत मी बारामतीच्या विकासासाठी कार्यरत असेल", असंही ते म्हणाले.

ज्येष्ठ नेते शरद पवार, सुप्रिया सुळे किंवा मी स्वतः कार्यकर्त्यांच्या जीवावरच मोठे झालेलो आहे, त्यामुळे आमच्या राजकीय प्रवासात कार्यकर्त्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी देखील कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे, अशी अपेक्षा देखील अजित पवार यांनी व्यक्त केली.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com