Gulabrao Patil News: ...तर मी एका मिनिटातच राजीनामा देईन; गुलाबराव पाटील असं का म्हणाले?

Gulabrao Patil News: ...तर मी एका मिनिटात राजीनामा देईन, अन्यथा संजय राऊत यांनी खासदारकी सोडावी, असं खुलं आव्हान मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांना दिलं.
Gulabrao Patil On  Sanjay Raut Allegations
Gulabrao Patil On Sanjay Raut AllegationsSaam TV

Gulabrao Patil On Sanjay Raut Allegations: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रविवारी पाचोऱ्यात जंगी सभा पार पडली. या सभेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. कोरोनाच्या नावाने जळगाव जिल्ह्यात तब्बल ४०० कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप राऊत यांनी केला. तर या घोटाळ्याचे सर्व कागदपत्र आपल्याकडे असल्याचं देखील राऊत यांनी म्हटलं. दरम्यान, राऊतांच्या या आरोपांवर गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

Gulabrao Patil On  Sanjay Raut Allegations
HC On Aurangabad Name Change: औरंगाबादचे नाव सरकार दरबारी बदलू नका; मुंबई हायकोर्टाचे महत्वाचे निर्देश

कोरोनाकाळात आपण चारशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे, त्यांनी आपल्यावरील आरोपाची चौकशी करावी. जर तो सिद्ध झाला तर मी एका मिनिटात राजीनामा देईन, अन्यथा संजय राऊत यांनी खासदारकी सोडावी, असं खुलं आव्हान मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांना दिलं. (Breaking Marathi News)

गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी जळगावात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांनंतर गुलाबराव पाटील चांगलेच आक्रमक झालेत. संजय राऊत हे नेहमी बेताल वक्तव्य करीत असतात. ते काहीही बोलत असतात. त्यांनी चौकटीत राहून बोलण्याची गरज आहे, असा टोला गुलाबराव पाटलांनी लगावला.

Gulabrao Patil On  Sanjay Raut Allegations
Pune Crime News: बारामती हादरली! घरात एकटीच झोपली होती महिला; रात्री अचानक ४ जण घुसले अन्...

त्यांनी आता आपल्यावर कोरोनाकाळात चारशे कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. संजय राऊत हे खासदार आहेत, त्यांनी जळगाव येथील तीन दिवस ठिय्या मारून स्वतः चौकशी करावी. कोरोनाकाळात पूर्ण १२१ कोटी रुपयाला मान्यता मिळाली आणि चारशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा ते आरोप करीत आहेत. (Maharashtra Political News)

अत्यंत चुकीचा ते आरोप करीत आहेत. त्या वेळी मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे होते, तर आरोग्यमंत्री राजेश टोपे होते. राऊत यांनी त्यांच्याकडून माहिती घ्यावी. संजय राऊत यांनी त्याची चौकशी करावी, जर तो सिद्ध झाला तर मी एका मिनिटात राजीनामा देईन, अन्यथा संजय राऊत यांनी खासदारकी सोडावी, असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com