Pune Crime News: बारामती हादरली! घरात एकटीच झोपली होती महिला; रात्री अचानक ४ जण घुसले अन्...

Baramati Crime News: महिला घरात एकटी झोपली असल्याचं पाहून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यांनी महिलेचे हातपाय बांधले.
Baramati Crime News
Baramati Crime NewsSaam TV
Published On

Pune Crime News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात चोरींच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. घरात कुणी नसल्याचं फायदा घेत चोरटे लाखो रुपयांचा ऐवज घेऊन पसार होत आहे. या अट्टल चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी मोहिम आखली आहे. अशातच पुणे जिल्ह्यातील बारामती शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. (Breaking Marathi News)

बारामती शहरातील एका घरात शिरून चोरट्यांनी तब्बल ६३ लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिला घरात एकटी झोपली असल्याचं पाहून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यांनी महिलेचे हातपाय बांधले. त्यानंतर दागिन्यांसह मुद्देमाल घेऊन धूम ठोकली.

Baramati Crime News
Mumbai Crime: मुंबई हादरली! भीक मागणाऱ्या मुलीला घरी आणले, काम देऊन लग्नही लावले; पण तिनेच केला घात

बारामती शहरातील (Baramati News) देवकाते नगर परिसरात रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकारामुळे संपूर्ण बारामती शहरात घबराट पसरली आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील देवकाते पार्क परिसरातील एका घरात महिला एकटीच होती. यावेळी अचानक चोरटे घरात घुसले. त्यांनी या महिलेचे हात पाय बांधून जबरी चोरी केली. प्राथमिक माहितीनुसार जमीन खरेदी करण्यासाठी या घरात ५५ लाख रुपयांची रोख रक्कम आणून ठेवली होती.

Baramati Crime News
Tuljapur News: तुळजापूर हादरलं! भर वर्गात चित्रकलेच्या शिक्षकाचं विद्यार्थीनीसोबत संतापजनक कृत्य

ही रक्कम आणि सोन्याची दागिने असा जवळपास ६३ लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. माहितीनुसार जमीन खरेदीसाठी आणून ठेवलेली ५५ लाख रुपयांची रोख रक्कम तसेच सोन्याची चैन, मिनी गंठण, अंगठी, कर्णफुले, मोबाईल असा जवळपास ६३ लाख रुपयांचा ऐवज चोरट्यानी चोरून नेला.

याप्रकरणी महिलेने पोलिसांत (Police) फिर्याद दिली असून बारामती पोलीस अधिक तपास करत आहेत. हा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ दखल घेतली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पाच पथके रवाना करण्यात आली आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com