Tuljapur News: तुळजापूर हादरलं! भर वर्गात चित्रकलेच्या शिक्षकाचं विद्यार्थीनीसोबत संतापजनक कृत्य

Tuljapur Crime: धाराशीव जिल्ह्यातील तुळजापुरात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Tuljapur Crime News
Tuljapur Crime NewsSaam TV
Published On

Tuljapur Crime News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला अत्याचाराच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचं प्रमाण सर्वाधिक आहे. महिला अत्याचाराविरोधात कठोरात कठोर कारवाईची मागणी होत असताना धाराशीवमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका चित्रकलेच्या शिक्षकानेच भर वर्गात १४ वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग केलाय. (Latest Marathi News)

Tuljapur Crime News
Mumbai Crime News: डोक्यात कमांडो कॅप, बुलेटवर पोलिसांचा लोगो; रुबाबही तसाच, पण एका चुकीने फसला अन् जेरबंद झाला

धाराशीव जिल्ह्यातील तुळजापुरात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून शिक्षकाविरोधात संताप देखील व्यक्त केला जात आहे. या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी, की दिनांक ६-१२-२०२२ रोजी सकाळी ०९ ते ९:३० दरम्यान आरोपी चित्रकला शिक्षकाने चित्रकला शिकवण्याच्या बहाण्याने १४ वर्षीय विदयार्थीनीचा हात धरला. (Breaking Marathi News)

त्यानंतर तिच्या पाठीवरून हात फिरवत लज्जा वाटेल असे कृत्य वर्गातील मुलांसमोर आणि मुलींसमोर केले. या प्रकरणी पीडित मुलीने या घडलेल्या प्रकरणी शाळेतील प्रशासनाकडे तक्रार केली होती. या प्रकरणाची चौकशी करून कार्यालयीन अधिक्षकांनी तुळजापूर पोलिस ठाण्यात आरोपी शिक्षकाविरोधात तक्रार दिली.

Tuljapur Crime News
Heat Stroke Death: निसर्गाने घात केला, सीमेवर लढायचं स्वप्न अपूर्णच राहिलं; उष्माघाताने घेतला अग्निवीर जवानाचा बळी

या प्रकरणी तुळजापूर पोलीस (Police) स्थानकात कलम ३५४,३५४(अ) भारतीय दंड विधान ८,१२, बालकांचे लैंगिक अपराधापासून सरंक्षण अधिनियमानुसार आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षक हे विद्यार्थ्यांची पिढी घडवतात. त्यामुळेच त्यांना समाजात आदर्श मानलं जात. मात्र, धाराशीवमधील तुळजापूर येथील या शिक्षकाने आदर्शालाच काळिमा फासण्याचे काम केले आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com