Mumbai Crime News: डोक्यात कमांडो कॅप, बुलेटवर पोलिसांचा लोगो; रुबाबही तसाच, पण एका चुकीने फसला अन् जेरबंद झाला

Police Arrest Fake Police: पोलिसांचा पेहराव करून फिरणाऱ्या तोतया पोलिसाला पकडण्यात विलेपार्ले पोलिसांना पोलिसांना यश आले आहे.
Vileparle Police Arrest Fake Police
Vileparle Police Arrest Fake PoliceSaam TV
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

Vileparle Police Arrest Fake Police : मुंबईत मागील काही दिवसांपासून पोलिस असल्याचे भासवून अनेकांची फसवणूक करणारी टोळी सक्रिय झालेली आहे. मुंबई पोलिसांनी अशा तोतया पोलिसांच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात केली आहे. काही दिवसांपूर्वी एमआयडीसी पोलिसांनी एका तोतया पोलिसाला अटक केली होती. आता विलेपार्ल पोलिसांनी सुद्धा असाच पेहराव करून फिरणाऱ्या भामट्याला ताब्यात घेतलं आहे. (Breaking Marathi News)

Vileparle Police Arrest Fake Police
Heat Stroke Death: निसर्गाने घात केला, सीमेवर लढायचं स्वप्न अपूर्णच राहिलं; उष्माघाताने घेतला अग्निवीर जवानाचा बळी

पोलिसांचा (Police) पेहराव करून फिरणाऱ्या तोतया पोलिसाला पकडण्यात विलेपार्ले पोलिसांना पोलिसांना यश आले आहे. आरोपी कमांडोप्रमाणे टोपी, बूट व दुचाकीवर पोलिसांचे चिन्ह लावून हा तोतया फिरत होता. त्याच्याविरोधात तोतयागिरी केल्याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनीच गुन्हा दाखल केला आहे. पवन दीपक मिश्रा (32 वर्ष) अस अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी पोलिस निरीक्षक भोसले हे विलेपार्ले पूर्वेकडील हनुमान रोड येथे गस्तीवर होते. त्यावेळी त्यांना एक व्यक्ती पोलिसांची कमांडो कॅप आणि पायात लाल बूट घालून उभा असलेला दिसला. या व्यक्तीला पाहून भोसले यांना संशय आला.

Vileparle Police Arrest Fake Police
Jio Recharge Plan: जिओचा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन; अनलिमिटेड कॉलिंगसह दिवसाला 2GB डेटा, जाणून घ्या काय आहे ऑफर

पोलीस निरीक्षक भोसले यांनी त्याला हटकून चौकशी केली असता, त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. भोसले यांनी त्याला तातडीने अटक करून सविस्तर चौकशी केली असता, तो तोतया पोलिस असल्याचं समोर आलं. आरोपीविरोधात भादवी 419, 170 कलमान्वये गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली.

आरोपी पवन दीपक मिश्रा हा विलेपार्ले पोलिसांच्या (Mumbai Police) ताब्यात असून पोलीस उपनिरीक्षक झेंडे हे याचा अधिक तपास करत आहेत. तोतया पोलीस बनून आरोपीने कुणाकुणाला फसवले आहे, कुणाकडून किती पैसे उकळले? याविषयीचा अधिक तपास विलेपार्ले पोलीस करत आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com