Heat Stroke Death: निसर्गाने घात केला, सीमेवर लढायचं स्वप्न अपूर्णच राहिलं; उष्माघाताने घेतला अग्निवीर जवानाचा बळी

Dhule News: नवी मुंबईतील खारघर परिसरात महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने १४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातही उष्माघाताने एका जवानाचा बळी घेतला आहे.
Dhule Agniveer JawanHarshal Thackeray Death
Dhule Agniveer JawanHarshal Thackeray DeathSaam TV
Published On

Dhule Agniveer Jawan Harshal Thackeray Death Heat Stroke: नवी मुंबईतील खारघर परिसरात महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने १४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातही उष्माघाताने एका जवानाचा बळी घेतला आहे. अग्निवीर भरती अंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या जवानाचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. (Latest Marathi News)

Dhule Agniveer JawanHarshal Thackeray Death
Cotton Price Maharashtra: शेतकरी बांधवांसाठी महत्वाची बातमी; कापसाचा भाव पुढच्या काही दिवसांत वाढणार का?

हर्षल संजय ठाकरे (वय २१ वर्ष) असे निधन झालेल्या जवानाचे नाव आहे. हर्षल ठाकरे हे मूळ धुळे (Dhule) जिल्ह्यातील रहिवाशी होते. त्यांच्या अचानक निधनाने ठाकरे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हर्षल हे नाशिक येथील देवळाली कॅम्प येथे भारतीय सेना दलाच्या चार वर्षे कालावधीच्या अग्निवीर प्रशिक्षण काळासाठी १ जानेवारीला रुजू झाले होते.

देवळाली कॅम्प (Nashik) येथे त्यांचे प्रशिक्षण सुरू होते. दरम्यान, हर्षल यांना उलट्या व ताप याचा त्रास झाल्यामुळे आर्टिलरी रुग्णालयात दाखल करण्यात आले. लान्स नायक नरेंद्र सिंग यांनी त्यांना आर्टिलरी सेंटरमध्ये दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले.  (Breaking Marathi News)

या प्रकरणी आर्टिलरी सेंटरतर्फे लेखी माहितीद्वारे पोलिसांना कळवण्यात आले आहे. त्यानुसार देवळाली कॅम्प पोलिसांनी हर्षल ठाकरे यांच्या मृत्यू प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. हर्षल ठाकरे यांना उष्माघाताचा त्रास का झाला, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही या दुर्दैवी घटनेमुळे नाशिकमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.

Dhule Agniveer JawanHarshal Thackeray Death
Jio Recharge Plan: जिओचा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन; अनलिमिटेड कॉलिंगसह दिवसाला 2GB डेटा, जाणून घ्या काय आहे ऑफर

दरम्यान, शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास हर्षल यांचे पार्थिव त्यांच्या मुळ गावी वरूळ येथे आणण्यात आले. तेथे त्यांची अंत्ययात्रा निघाली. यावेळ हर्षल ठाकरे अमर रहे अशा घोषणा तरुणांनी दिल्या. त्यानंतर पार्थिवावर मोठा भाऊ गौरव मराठे यांनी अग्नीडाग देऊन शासकीय इतामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

उष्माघात म्हणजे काय?

उष्माघात म्हणजे शरीराचे तापमान ३८.१ पेक्षा अधिक किंवा त्याहून अधिक स्थिर राहणे. उष्माघात होण्याचे नेमके कारण म्हणजे शरीरातून बाहेर पडणाऱ्या उष्णतेहून शोषलेली उष्णता अधिक असते. यामुळे शरीराचे तापमान वाढते. उष्माघात म्हणजे हीट स्ट्रोक किंवा त्याला सनस्ट्रोक असेही म्हणतात.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com