Chhatrapati Sambhaji Nagar News: नामांतराबाबत अंतिम अधिसूचना येत नाही, तोपर्यंत औरंगाबादचं नाव सरकारी दस्तावेजांवर बदलू नका, असे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. औरंगाबाद नामांतरावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीवर हायकोर्टाने हे महत्वाचे निर्देश दिले आहेत. याबाबतची पुढील सुनावणी ७ जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. (Latest Marathi News)
दोन महिन्यांपूर्वी औरंगाबाद शहराचे (Chhatrapati Sambhaji Nagar) नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले आहे. त्यानंतर ठीक-ठिकाणी औरंगाबाद शहराचे नाव पुसून त्या ठिकाणी छत्रपती संभाजी नगर अशा स्वरूपाचा उल्लेख करण्यात आला आहे. खरं म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये औरंगाबाद शहराचं नामांतर छत्रपती संभाजी नगर होताच राज्यात ठिकठिकाणी जल्लोष पाहायला मिळाला होता.
भारतीय जनता पार्टी, शिवसेना, शिवसेना ठाकरे गट, मनसे यांसह अनेक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला होता. औरंगाबाद शहरांचं नामांतरण झाल्यानंतर ठिकठिकाणी ढोल ताशे वाजवत, पेढे भरवत आनंद साजरा करण्यात आला होता. मात्र, या नामकरणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. (Breaking Marathi News)
टपाल कार्यालयं, महसूल, स्थानिक पोलीस, न्यायालयामध्ये संभाजीनगरचा उल्लेख सुरू झाल्याची याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयात तक्रार केली आहे. मुस्लिम बहुल विभागांत नावं तातडीनं बदलण्याची जणू मोहिमच हाती घेतल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी कोर्टात केला आहे.
दरम्यान, अगदी आठवडाभरापूर्वी उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव हे धाराशिव न वापरता उस्मानाबाद वापरा, असा आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. १० जूनपर्यंत जूनपर्यंत उस्मानाबाद हे नाव वापरा असं कोर्टाने म्हटलं होतं. त्यामुळे उस्मानाबादप्रमाणेच औरंगाबादमध्येही तसेच निर्देश जारी करू, अशी ग्वाही महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी दिली आहे. आता या मुद्द्यावरील सुनावणी ७ जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.