Beed News: उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी बीडचे शिवसैनिक सुमंत रुईकर पायी तिरुपती बालाजी निघाले होते. दरम्यान प्रवासात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घरातील कर्ता व्यक्ती निघून गेल्याने रुईकर कुटुंबीय उघड्यावर पडले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉल करत रुईकर कुटुंबीयांना धीर दिला. तसेच बाजीराव चव्हाण यांनी रुईकर यांच्या मुलांच्या शिक्षणासह इतर जबाबदारी घेतली. (Latest Marathi News)
इतकंच नाही तर, त्यांनी रुईकर कुटुंबीयांना (Beed) हक्काचं घर देखील बांधून दिलं. "उद्धव साहेबांना आयुष्य लाभावे म्हणून पती गेले होते, पण 10 दिवसात साधा एक फोन आला नाही. इतर कार्यकर्त्यांनी भेट घेतली पण मदत केली नाही. पण मुख्यमंत्री शिंदे यांच्यामुळे आज आम्हाला सुखाचा घास मिळाला आहे", अशी भावूक प्रतिक्रिया सुमंत रुईकर यांच्या पत्नी कीर्ती रुईकर यांनी दिली. (Breaking Marathi News)
बाजीराव चव्हाण हे माझ्या भावासमान असून त्यांच्यामुळे उघड्यावर पडलेला संसार पुन्हा उभा राहिला, उद्धव ठाकरे यांना दीर्घआयुष्य लाभावे म्हणून पती सुमंत रुईकर हे पायी गेले. ते कट्टर शिवसैनिक होते, मात्र त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण ठाकरे यांनी 10 दिवसात साधा फोनही केला नाही, याचं दुर्दैव वाटतं, अशी खंतही कीर्ती रुईकर यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवाप्रमाने लक्ष दिल्यामुळे पुन्हा घर उभारले आहे. ठाकरे यांच्यासाठी गेले पण मदत शिंदे यांनी केली, असं म्हणत कीर्ती रुकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार देखील मानले आहेत.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना वापरून घ्यायचे काम केले. काम खतंम आदमी खतम, असा ठाकरे यांचा कार्यक्रम आहे. जमिनीवर पाय ठेऊन चालणारे नेते शिंदे साहेब आहेत. म्हणून ते मुख्यमंत्री आहेत, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक बाजीराव चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.