Viral Funny Dance Video: जबरदस्तचं! असा खतरनाक 'कोंबडा डान्स' कधीच पाहिला नसेल; व्हिडिओने लावले नेटकऱ्यांना वेड

Funny Dance Video News: मोर डान्स, नागिण डान्स नंतर आता मार्केटमध्ये कोंबडा डान्सची एन्ट्री झाली आहे, जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल...
Viral Dance Video
Viral Dance VideoSaamtv

Viral Kombda Dance Video: सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डान्स व्हिडिओ व्हायरल होतात. हे जबरदस्त डान्स व्हिडिओ पाहून हसून हसून पुरेवाट लागते. सध्या सोशल मीडियावर अशाच एका डान्सची तुफान चर्चा होत आहे. व्हिडिओमधील तरुणाच्या डान्सला कोंबडा डान्स असे नाव देण्यात आले आहे. काय आहे या व्हायरल व्हिडिओमागील कथा, चला जाणून घेवू... (Latest Marathi News)

Viral Dance Video
Jalna Crime News: 'त्या' ॲपवरून जुळले प्रेमसंबंध; समलिंगी मित्राच्या पत्नीसोबतच्या अनैतिक संंबधांतून बँक अधिकाऱ्याचा खून

लग्न किंवा समारंभात अनेक प्रकारचे डान्स आपल्याला पहायला मिळतात. कथ्थक, बॉलिवूड डान्स, ब्रेक डान्स, डिस्को डान्स, मिरवणूक डान्स आणि लग्नात केला जाणारा सर्वाधिक लोकप्रिय नागिन डान्स. मात्र आता मार्केटमध्ये कोंबडा डान्सचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा डान्स पाहून खरंच तुम्ही देखील थक्कच व्हाल. या डान्समध्ये अशा अशा स्टेप्स मारल्या आहेत. की ज्यांची तुम्ही कल्पना देखील करू शकत नाही.

पाठीवर झाडू बांधलेल्या पोराने कोंबड्याचा लूक साकारण्यासाठी हातात देखील लाल कलरची पट्टी गुंडाळली आहे. त्यामुळे व्हिडीओ पाहून लोक म्हणतायेत की हाच खरा कोंबडा डान्स. एका विचित्र गाण्यावर या तरुणाने डान्स (Viral Dance Video) केला आहे. मोजून काही सेकंदाचा असलेला हा व्हिडीओ नेटकऱ्यांनी डोक्यावर घेतला आहे.

हा डान्स आतापर्यंत १ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला आहे. शिवाय हजारो नेटकऱ्यांनी त्यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी असा डान्स आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलाय त्यामुळे ते सर्वजण शॉक आहेत. तर काहींना या स्टेप्स पाहून कोंबड्यांऐवजी मोर हा पक्षी आठवतोय. (Social Media)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com