Hyderabad PM Rally: भर जनसभेत तरुणी चढली लाईट टॉवरवर; तरुणीचा स्टंट पाहून पंतप्रधान मोदींचा जीव लागला टांगणीला

Girl Climbed Light Tower: सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि बीआरएसवर निशाणा साधला. या सभेत मात्र एका मुलीच्या स्टंटमुळे पंतप्रधान मोदींचा जीव टांगणीला लागला होता.
PM Modi Rally
PM Modi Rally ANI
Published On

Girl Climbed Light Tower During PM Modi Rally:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणाच्या सिकंदराबादमधील एका जनसभेला संबोधित केलं. या सभेदरम्यान एक विचित्र घटना घडल्यामुळे जनतेसह पंतप्रधान मोदींचं टेन्शन वाढलं होतं. पंतप्रधान मोदींचं लक्ष वेधण्यासाठी ती थेट लाईट टॉवर चढली. पंतप्रधान मोदींची नजर त्या मुलीवर पडताच ते म्हणाले, बेटा, तू खाली ये. हे करणे योग्य नाही, त्याची वायर खराब झाली असल्याचं म्हणत त्या तरुणीला खाली उतरण्याची विनंती केली. (Latest News)

पंतप्रधान मोदी तिची वारंवार विनंती करतात. परंतु टॉरवर चढलेली तरुणी त्यांचं काही ऐकत नाही. तरूणी ऐकत नसल्यानं पंतप्रधान मोदींचं चिंता वाढली होती. मी तुझं म्हणणं ऐकतो, मी तुझ्या पाठीशी आहे बेटा, कृपया खाली ये. वायर खराब झालीय. तू खाली ये, मी तुझे ऐकतो, असं म्हणत मोदी तिला खाली उतरण्याची विनंती केली. परंतु ती मुलगी टॉवरच्या वरती जाऊ लागली.

तेव्हा मोदी तिला शॉर्ट सर्किट झाल्याचं सांगतात. तू खाली ये. येथे असं करून फायदा होणार नाही. मी तुमच्यासाठी येथे आलोय. तुम्ही कृष्णाजींचे ऐका असं मोदींनी सांगितलं. यानंतर मुलगी खाली उतरते. त्यानंतर पंतप्रधान मोदींचा जीव भांड्यात पडला. मुलगी खाली उतरल्यानंतर त्यांनी तिचे आभार मानले. दरम्यान आभार मानले. मात्र मुलगी टॉवरवर का चढली हे कळू शकलेले नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि बीआरएसवर निशाणा साधला. काँग्रेस आणि बीआरएस एकत्र आहेत. ते पडद्यामागे त्यांचा खेळ खेळतात. एका बाजूला काँग्रेस आणि बीआरएस आहे तर दुसऱ्या बाजूला भाजप आहे. काँग्रेस आणि बीआरएसची लोकांवर राज्य करण्याची मानसिकता आहे. तर भाजप जनतेच्या सेवेसाठी समर्पित आहे. तेलंगणातील विधानसभेच्या ११९ जागांसाठी ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. ३ डिसेंबरला निकाल लागणार आहे.

आणखीन एक व्हायरल झालेल्या दुसर्‍या व्हिडिओमध्ये, पंतप्रधान मोदी हे माडिगा आरक्षण पोराटा समिती (एमआरपीएस) चे प्रमुख मंदा कृष्णा मडिगा यांना सांत्वन देताना दिसले, जे सार्वजनिक रॅलीदरम्यान दृश्यमानपणे भावूक झाले होते. व्हिडिओमध्ये रॅलीदरम्यान पीएम मोदींच्या शेजारी बसलेल्या मडिगाला अश्रू अनावर झाले होते. पंतप्रधानांनी तत्परतेने दलित नेत्याला मिठी मारली आणि त्याच्या डोक्यावर हलकेच थोपटले. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी मडिगा यांचा हात धरून भावनिक क्षणी एकता व्यक्त करत आश्वासन दिले.

PM Modi Rally
Telangana Accident: तेलंगणात प्रचारादरम्यान मंत्र्यांच्या बसला अपघात, छतावरुन थेट जमिनीवर कोसळले, पाहा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com