Madhya Pradesh Election: 5 वर्षे मोफत रेशन, शेतकऱ्यांना 12000 रुपये; मध्य प्रदेशात भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध; दिली मोठी 20 आश्वासने

MP BJP Manifesto 2023: 5 वर्षे मोफत रेशन, शेतकऱ्यांना 12000 रुपये; मध्य प्रदेशात भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध; दिली मोठी 20 आश्वासने
MP BJP Manifesto 2023
MP BJP Manifesto 2023Saam Tv
Published On

MP BJP Manifesto 2023:

मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता काहीच दिवशी शिल्लक राहिले आहेत. अशातच भारतीय जनता पक्षाने (भाजप) शनिवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी 'मध्य प्रदेश संकल्प पत्र 2023' प्रसिद्ध करताना सांगितले की, 'काळानुसार जाहीरनाम्याचे महत्त्व हळूहळू कमी होत आहे. कारण आधी आश्वासन देण्याचं आणि नंतर विसरण्याचे काम राजकीय पक्षांनी केले आहे. मात्र भाजप हा एकमेव पक्ष आहे, ज्याने या दस्तऐवजाला आपल्या रोडमॅपचा आधार बनवून जमिनीवर अंमलात आणण्याचे कामही केले आहे. हा आमचा ट्रॅक रेकॉर्ड आहे.'' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

MP BJP Manifesto 2023
Gujarat News: सुरत रेल्वे स्थानकावर दिवाळीत घरी जाणाऱ्यांची मोठी गर्दी; ट्रेन पकडताना चेंगराचेंगरी, एकाचा मृत्यू

जेपी नड्डा म्हणाले, '2003 मध्ये मध्य प्रदेशमध्ये औद्योगिक विकासाचा दर 0.61 टक्के होता, जो आज भाजप सरकारच्या 20 वर्षांच्या कार्यकाळात 24 टक्के इतका वाढला आहे. 2003 मध्ये येथे फक्त 4,231 हेक्टर जमीन सिंचनाची सोय होती, जी आज 16,284 हेक्टर इतकी वाढली आहे.  (Latest Marathi News)

मध्य प्रदेशात भाजपची 20 मोठी आश्वासने

  • गरिबांना 5 वर्षे मोफत रेशन मिळत राहील.

  • शेतकऱ्यांकडून गहू 2700 रुपये प्रति क्विंटल आणि धान 3100 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केला जाईल.

  • किसान सन्मान निधी आणि किसान कल्याण योजनेतून शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 रुपये दिले जातील.

  • मध्य प्रदेशातील एकही कुटुंब बेघर राहणार नाही. पंतप्रधान गृहनिर्माण योजनेसोबतच मुख्यमंत्री सार्वजनिक गृहनिर्माण योजना सुरू करणार.

MP BJP Manifesto 2023
Sharad Koli News: मुंब्र्यातील राड्याची धग सोलापुरात.. शरद कोळींचा शिंदे गटाला थेट इशारा, म्हणाले; तुम्हाला दिवसा...
  • आर्थिक मदतीसोबतच लाडक्या बहिणींना कायमस्वरूपी घरही मिळेल.

  • प्रत्येक कुटुंबात किमान एक रोजगार किंवा स्वयंरोजगाराची संधी.

  • कौशल्य प्रशिक्षणाद्वारे 15 लाख ग्रामीण महिला कोट्यवधी बनवणार.

  • लाडली लक्ष्मीला जन्मापासून ते 21 वर्षे वयापर्यंत एकूण 2 लाख रुपये दिले जातील.

  • गरीब कुटुंबातील मुलींना KG ते PG पर्यंत मोफत शिक्षण देईल.

  • उज्ज्वला आणि लाडली बहिणींना 450 रुपयांना गॅस सिलिंडर मिळेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com