तेलंगणा विधानसभेची निवडणूक ३० नोव्हेंबर रोजी असून ३ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. अशात तेलंगणामधील आरमोर मतदारसंघात बीआरएस निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एक मोठा अपघात झालाय. यामध्ये २ मंत्र्यांसह १ खासदार प्रचार करत होते.
प्रचारासाठी कार्यकर्त्यांसह बसमधून प्रवास सुरू होता. यावेळी मंत्री केटीआर, जीवन रेड्डी आणि खासदार सुरेश रेड्डी प्रचाराच्या वाहनातून थेट खाली पडले. केटीआर, पुढे पडताना त्यांचे पोट सेफ्टी रॉडवर दाबले गेले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. चालकाने अचानक ब्रेक लावल्याने हा अपघात झाल्याचं दिसतंय.
अपघाताचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, आरमोर येथे एका मिनी बसमधून प्रचार रॅली निघालीये. बस रस्त्यावर धावत असताना आजूबाजूला कार्यकर्ते आणि सुरक्षारक्षकांनी घोळका केला आहे. मंत्री केटीआर, जीवन रेड्डी आणि खासदार सुरेश रेड्डी यावेळी सनरूफमध्ये उभे आहेत आणि नागरिकांना हाथ दाखवत प्रचार करतायत.
रस्ता व्यवस्थित असतानाही वाहनचालक अचानक ब्रेक दाबतो. त्यामुळे सनरूफवरील सर्वचजण खाली कोसळतात. अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. अपघाताचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. नागरिकांनी यावर विविध कमेंट्स केल्यात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.