नमो भारत ट्रेनमध्ये शरीरसंबंध ठेवणाऱ्यांवर गुन्हा दाखल; तरुण जोडप्याला किती वर्षांची शिक्षा होऊ शकते? जाणून घ्या

Namo Bharat Train viral video : नमो भारत ट्रेनमध्ये शरीरसंबंध ठेवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. ट्रेनमधील या तरुण जोडप्याला किती वर्षांची शिक्षा होऊ शकते? जाणून घेऊयात.
 Train viral video
Namo Bharat Train viral videoSaam tv
Published On
Summary

नमो भारत ट्रेनमध्ये शरीरसंबंध ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध सुरू

पोलीस स्टेशनमध्ये तिघांच्या विरोधात गुन्हा

तिघांवर काय कारवाई होणार?

दिल्ली-मेरठ मार्गावर धावणाऱ्या नमो भारत ट्रेनमध्ये शरीरसंबंध ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध सुरू आहे. एनसीआरटीसीने मुरादनगर पोलीस स्टेशनमध्ये तीन लोकांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. धावत्या ट्रेनमध्ये शारीरिक संबंध ठेवणाऱ्या जोडप्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या विरोधातही एफआयर नोंदवण्यात आला आहे. तसेच या कर्मचाऱ्याची कामावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

 Train viral video
kolhapur Politics : कोल्हापूर महापालिकेसाठी सतेज पाटलांनी ठोकला शड्डू; यंदा केली नव्या टॅगलाईनची घोषणा

एका आठवड्याआधी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. धावत्या ट्रेनमधील या जोडप्याचे इतरही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोघेही महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. तरुण हा बीटेकचा विद्यार्थी आहे. तर तरुणी ही त्याच कॉलेजमध्ये बीसीए करत आहे. परंतु पोलिसांनी या प्रकरणी दुजोरा दिलेला नाही.

ट्रेनमधील या जोडप्याचा शरीरसंबंधाचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या आरोपी रिषभ कुमार याला नोकरीवरून निलंबित करण्यात आलं आहे. तर सोशल मीडियावर या दोन्ही जोडप्यावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एका आठवड्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंद करण्यात आली आहे.

 Train viral video
Fact Check : तुमचं व्हॉट्सअॅप हॅक होतंय? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? VIDEO

मीडिया रिपोर्टनुसार, अश्लील कृत्यामुळे व्हायरल झालेले जोडपे आणि ऑपरेटरवर एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी आता पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम २९६, कलम ७७ आणि आयटी अॅक्ट ६७ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

 Train viral video
शरद पवारांना मोठा धक्का; पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांचा राजीनामा

किती होऊ शकते शिक्षा?

तपासात सहभागी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या प्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या जोडप्याची ओळख पट‍वण्याचा शोध सुरू आहे. सीसीटीव्ही व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणात जोडपे दोषी सिद्ध झाल्यास भारतीय न्याय संहितेच्या २९६ कलमाअंतर्गत आरोपींना जास्तीत जास्त तीन महिन्यांची कैद, १००० रुपयांचा दंड किंवा दोन्ही शिक्षा भोगाव्या लागू शकतात. तर कलम ७७ अंतर्गत कमीत कमी एका वर्ष ते तीन वर्षांचा तुरूंगवास होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com