शरद पवारांना मोठा धक्का; पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांचा राजीनामा

prashant jagtap resigns : पुण्यात शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
prashant jagtap
prashant jagtap resigns Saam tv
Published On
Summary

राष्ट्रवादीचे शहरअध्यक्ष प्रशांत जगताप यांचा राजीनामा

दोन्ही पक्षाच्या आघाडीमुळे नाराज होऊन प्रशांत जगताप यांचा राजीनामा

जगताप यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

पुण्यातील राजकीय वर्तुळातून मोठी बातमी हाती आली आहे. पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या आघाडीमुळे नाराज होत प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला. प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

prashant jagtap
नमो भारत ट्रेनमध्ये शरीरसंबंध ठेवणाऱ्यांवर गुन्हा दाखल; तरुण जोडप्याला किती वर्षांची शिक्षा होऊ शकते? जाणून घ्या

पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. मात्र, दोन्ही पक्षाच्या एकत्र येण्याला शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी विरोध दर्शवला आहे. या आघाडीवरून नाराज झालेले प्रशांत जगताप यांनी थेट पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

prashant jagtap
Santosh Deshmukh Case : मला आरोप मान्य नाही, कराड बोलला; न्यायाधीशांनी फटकारलं, कोर्टात नेमकं काय घडलं?

प्रशांत जगताप यांनी म्हटलं की, 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्राथमिक आणि क्रियाशील सदस्यत्वाचा आज राजीनामा देत आहे. आजपर्यंत दिलेल्या संधीसाठी नेतृत्वाचे मनापासून आभार मानतो'.

'२७ वर्षांपूर्वी मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले. तेव्हा कुठल्या पदासाठी नव्हे, तर पुरोगामी विचारांची चळवळ पुढे नेण्यासाठी मी कार्यरत झालोय. आज २७ वर्षांनंतरही हेच एकमेव ध्येय माझ्या मनात आहे. यापुढेही पुरोगामी विचारांसाठी माझी सामाजिक आणि राजकीय वाटचाल सुरूच असेल, असेही प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केलं आहे.

prashant jagtap
पुणे-बेंगळुरू माaर्गावर बसवर दरोडा, बसमधील दरोड्याचा कट कुठे शिजला? हादरवणाारी माहिती समोर

'आजपर्यंत अत्यंत निष्ठेने मला साथ देणाऱ्या, यापुढेही संघर्षाच्या वाटेवर माझ्यासोबत येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार, असंही प्रशांत जगताप यांनी म्हटलं. 'मी माझे तत्व नेहमी पाळेल. माझी आणि माझ्या नेत्यांमध्ये काय चर्चा झाली, याची मी वाच्यता करणार नाही. माझं म्हणणं सुप्रिया ताई यांनी ऐकून घेतलं. त्यांना धन्यवाद म्हणतो, असेही त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com