kolhapur Politics : कोल्हापूर महापालिकेसाठी सतेज पाटलांनी ठोकला शड्डू; यंदा केली नव्या टॅगलाईनची घोषणा

Kolhapur political News : कोल्हापुर महापालिकेसाठी काँग्रेसची टॅगलाईन ठरलीय.. लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरात काँग्रेसच्या टॅगलाईनमुळे पक्षाला चांगलचं यश मिळालं होतं.. त्यातच महापालिका निवडणुकीतील काँग्रेसच्या टॅगलाईनं सर्वचं लक्ष वेधलंय... नेमकी ही टॅगलाईन काय आहे? कोल्हापुरकरांना काँग्रेसने कशी साद घातलीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Maharashtra Politics
congress news Saam tv
Published On

ही आहे कोल्हापूर महापालिकेसाठी काँग्रेसची टॅगलाईन.... याआधी आमचं ठरलंय ही लोकसभेतली टॅगलाईन काँग्रेसन वापरली आणि त्याला यशही मिळालं. आता कोल्हापूर जिल्ह्यात नगरपरिषदेत महायुतीने मुसंडी मारलेली असली तरी महापालिकेसाठी पुन्हा प्रचारात आघाडी घेत नव्या टॅगलाईनची घोषणा केलीय...

Maharashtra Politics
Maharashtra Politics : ईव्हीएम मशीनमध्ये घोळ; निवडणूक निकालानंतर ७ कर्मचाऱ्यांचं निलंबन

सतेज पाटील आणि खासदार शाहू छत्रपतींच्या हस्ते टॅगलाईनची घोषणा केलीय... तर 8 दिवसात कोल्हापूरकरांच्या सहभागातून काँग्रेसचा जाहीरनामा तयार करण्यात येणार असल्याचं सतेज पाटलांनी सांगितलंय..

नगरपालिकेतील यशानंतर आत्मविश्वास दुणावलेल्या महायुतीने कोल्हापूर महापालिका जिंकण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत... त्याच दरम्यान लोकसभा, विधानसभा आणि नगरपरिषदेत काँग्रेसची खिंड एकहाती लढवणाऱ्या सतेज पाटलांनी कोल्हापूर महापालिकेसाठी शड्डू ठोकलाय... मात्र 2017 मधील कोल्हापूर महापालिकेतील संख्याबळ नेमकं कसं होतं...पाहूयात...

Maharashtra Politics
ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; पक्षातील बड्या नेत्याने साथ सोडली

2015 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपला 32, काँग्रेसला 27, राष्ट्रवादी 15 तर शिवसेनेला 4 जागांवर विजय मिळाला होता...लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या रणनीतीने महायुतीला दणका दिला... आता सतेज पाटलांनी महाविकास आघाडीची मोट बांधण्याच्या हालचाली करतानाच महायुतीला सभेतून उत्तर देण्याचा इशारा दिलाय...

Maharashtra Politics
नमो भारत एक्स्प्रेसमध्ये शरीरसंबंध ठेवले, आता अंगाशी येणार; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तरूण-तरुणीवर गुन्हा

दुसरीकडे कोल्हापुरात चांगले रस्ते, स्वच्छ आणि मुबलक पाणी, पार्किंगचा बोजवारा, आयटी पार्क, उद्यानांचे सुशोभीकरण, कोल्हापूर शहराची हद्दवाढ यासह अनेक प्रश्न गेली अनेक वर्ष प्रलंबित आहेत. असं असताना काँग्रेसने थेट जनतेलाच आता आव्हान केलंय की... कोल्हापूर कस्सं... तुम्ही म्हणाल तस्सं आता जनता काँग्रेसला पुढील आठ दिवसात नेमक्या काय सूचना करते ? काय सल्ला देते ? आणि प्रत्यक्षात निवडणुकीत लोकसभेप्रमाणेच जनता काँग्रेसच्या पंजाला साथ देते का? याचीच उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com