ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; पक्षातील बड्या नेत्याने साथ सोडली

nashik Congress : ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. नाशिकमधील काँग्रेस पक्षातील बड्या नेत्याने साथ सोडली.
Municipal Corporation Elections
Congress Strengthens CampaignSaam tv
Published On
Summary

ऐन निवडणुकीत काँग्रेसला नाशिकमध्ये मोठा धक्का

नाशिकमध्ये बड्या नेत्याने सोडली पक्षाची साथ

नाशिकमध्ये दोन माजी नगरसेवकांनी दिला पक्षाचा राजीनामा

राज्यभरात महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी पक्षाची जागावाटपावर चर्चा सुरू आहे. तर ठाकरे बंधू देखील उद्या युतीची घोषणा करणार आहे. नाशिकमध्येही महापालिका निवडणुकीमुळे राजकारण तापलं आहे. या निवडणुकीच्या धावपळीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. नाशिकमधील दोन माजी नगरसेवकांनी पक्षाची साथ सोडली आहे.

Municipal Corporation Elections
हिंदूंनी किमान ३-४ मुलं जन्माला घातली पाहिजेत; नवनीत राणा यांचं वक्तव्य

ऐन निवडणुकीच्या काळात काँग्रेसला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव आणि माजी नगरसेवक राहुल दिवे यांनी राजीनामा दिला आहे. दिवे यांनी काँग्रेस पक्षाच्या पद आणि सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. राहुल दिवे यांच्यासहित माजी नगरसेवक आशा तडवी यांनीही राजीनामा दिला आहे.

स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यासाठी मुभा दिला जात नसल्याने नाशिकमधील काँग्रेसमध्ये नाराजी असल्याची दिवे यांचं म्हणणं आहे. महापालिका निवडणुकांसाठी मनसेसह इतर पक्षासोबत आघाडी करण्याची आमची इच्छा होती. मात्र पक्षाने परवानगी नाकारल्याचे दिवे यांनी सांगितले.

Municipal Corporation Elections
विजयी मिरवणुकीत राडा; कारवर फटाके फोडण्याला विरोध केला, भाजप नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून २ महिलांना मारहाण

'आघाडी झाली नाही तर नुकसान होईल ही आमची भूमिका आम्ही मांडली होती. भाजप अथवा शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याची कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आज संध्याकाळी बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार आहे, असे दिवे यांनी जाहीर केले.

पुण्यातही काँग्रेसला धक्का

पुण्यातील काँग्रेस पक्षाचे शहराचे उपाध्यक्ष मुक्तार शेख यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर शेख यांनी घड्याळ हाती बांधलं आहे. पुण्यात काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष असलेले मुख्तार शेख यांनी त्यांच्या पुत्रासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. दोन वेळा काँग्रेसकडून नगरसेवक राहिलेले शेख आणि विकार अहमद शेख या दोघांनीही अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com