नमो भारत एक्स्प्रेसमध्ये शरीरसंबंध ठेवले, आता अंगाशी येणार; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तरूण-तरुणीवर गुन्हा

namo bharat express rapid rail train viral video : नमो भारत एक्स्प्रेसमध्ये शरीरसंबंध ठेवणं आता अंगाशी येणार आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तरूण-तरुणीवर गुन्हा दाखल होणार आहे.
namo bharat express
rapid rail train viral video Saam tv
Published On
Summary

ट्रेनमध्ये शरीरसंबंध ठेवणाऱ्या जोडप्यावर कारवाई

दोघांवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा

पोलिसांकडून पुढील कारवाईला सुरुवात

नमो भारत ट्रेनमध्ये शरीरसंबंध ठेवणाऱ्या जोडप्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या जोडप्याविरोधात NCRTC ने मुरादनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला आहे. गेल्या आठवडाभरापासून दोघांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंदवून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.

एका आठवड्यापूर्वी दोघांच्या शरीरसंबंधाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यांच्या अश्लील व्हिडिओवर नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली होती. नेटकऱ्यांनी या कपलवर कायदेशीर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर एनसीआरटीसीचे अधिकाऱ्यांनी कारवाईसाठी पाऊल उचललं.

namo bharat express
Maharashtra Politics : ईव्हीएम मशीनमध्ये घोळ; निवडणूक निकालानंतर ७ कर्मचाऱ्यांचं निलंबन

एनसीआरटीसीचे अधिकारी दुष्यंत कुमार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तरुण-तरुणीवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या ऑपरेटरविरोधातही गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळत आहे.

namo bharat express
Ajit Pawar : अजित पवारांनाही तिढे सुटेना; पुण्यातील प्रभाग क्रमांक ३८ चा असा कुठला गुंता आहे?

मीडिया रिपोर्टनुसार, या प्रकरणी पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे. धावत्या एक्स्प्रेसमध्ये शरीरसंबंध ठेवणाऱ्या जोडप्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या पुढे आता एक्स्प्रेसमध्ये गैरकृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आलं आहे.

namo bharat express
Unnao Case : बलात्कार प्रकरणात भाजपच्या माजी आमदाराला दिलासा; हायकोर्टाकडून जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती

तत्पूर्वी, नमो भारत ट्रेनमध्ये २ वर्षांत दोन कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. दिवसेंदिवस या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहेत. नोव्हेंबर २०२३ साली या ट्रेनमधून महिन्याला ७२००० प्रवासी प्रवास करत होते. आता जुलै २०२५ साली आकडा १५ लाखांवर पोहोचला आहे. आनंद विहार सारख्या प्रमुख स्टेशनवरून दिवसाला सरासरी ६० हजारांहून अधिक प्रवासी प्रवास करत आहेत.

Q

नमो भारत एक्स्प्रेसमध्ये नेमकं काय घडलं?

A

एक्सप्रेस ट्रेनमधील एका जोडप्याचा शरीरसंबंधाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com