

पुणे महापालिकेत 41 प्रभाग
प्रभाग क्रमांक 38 चा तिढा अजित पवारांना सुटता सुटेना
या प्रभागात १ लाखांहून अधिक मतदार
सचिन जाधव, साम टीव्ही
पुणे महापालिका निवडणुकीत 41 प्रभाग आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक 38 बालाजी नगर आंबेगाव कात्रज हा एकमेव प्रभाग पाच नगरसेवकांसाठी आरक्षित आहे. या वार्डात अजित पवार गटाकडून माजी महापौर दत्ता धनकवडे,माजी नगरसेवक युवराज बेलदरे, प्रकाश कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) स्मिता कोंढरे या देखील अजित पवार गटात येऊन निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. विकास फाटे हेही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडणूक लढवणार आहेत.
माजी महापौर दत्ता धनकवडे माजी नगरसेवक युवराज बेलधरे, माजी नगरसेवक प्रकाश कदम हे तिघेही विद्यमान नगरसेवक होते. आता ज्याप्रमाणे वॉर्ड आरक्षित आहे. त्यामध्ये या विद्यमान पुरुष नगरसेवकांमध्ये एका नगरसेवकाला थांबावे लागणार आहे. त्या जागी घरातील महिला द्यावी लागणार आहे. मात्र या क्षणाला तरीही तिघेही विद्यमान नगरसेवक स्वतः निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याने प्रभाग क्रमांक ३८ मधील तिढा अजित पवार यांना सुटता सुटेना झाला आहे.
प्रभाग क्रमांक ३८ चे मतदान १ लाख २३ हजार ९८१ एवढे मतदान असलेला मतदारसंघ आहे. या मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं प्राबल्य जास्त आहे. त्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघात इच्छुकांची संख्याही जास्त आहे.
सर्वसाधारण दोन महिला आणि एक पुरुष तर मागासवर्ग नागरिकांचा एक पुरूष आणि एक महिला असा पाच नगरसेवकांसाठी आरक्षित वॉर्ड आहे. आज सकाळपासून अजित पवार बारामती हॉस्टेल येथे प्रभाग क्रमांक ३८ साठी दोन ते तीन वेळा सर्वांना एकत्रित करून तिढा सोडवण्यासाठी बैठक घेत आहेत. मात्र अजूनपर्यंत सुटलेला नाही. त्यामुळे प्रभाग क्रमांक ३८ चा तिढा अजित पवार कसा सोडवणार हे पाहावे लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.