ऐन निवडणुकीत शिवसेनेवर दु:खाचा डोंगर; सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारं नेतृत्व काळाच्या पडद्याआड

Shivsena wani leader vishwas nandekar : सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारे विश्वास नांदेकर यांचं निधन झालं. नांदेकर यांच्या निधानाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
vishwas nandekar death news
vishwas nandekar deathSaam tv
Published On
Summary

माजी आमदार विश्वास नांदेकर यांचं निधन

नांदेकर यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा

रुग्णालयात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू

संजय राठोड, साम टीव्ही

राजकीय पक्षांच्या नेत्यांची महापालिका निवडणुकांसाठी धावपळ सुरु असताना राजकीय वर्तुळातून एक दु:खद वार्ता समोर आली आहे. एकसंघ शिवसेनेचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांचं निधन झालं आहे. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचा आज सोमवारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेकर यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १६ डिसेंबर रोजी माजी आमदार नांदेकर यांची भेट घेतली होती. त्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. तसेच त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची डॉक्टरांकडून माहिती घेतली होती. त्यावेळी देखील नांदेकर यांची प्रकृती चिंताजनक दिसत होती.

vishwas nandekar death news
Maharashtra Politics : मतदारांचा घराणेशाहीला सुरुंग; एका घरातले 6 उमेदवार, सहाही पडले

शिवसेना तालुका प्रमुख ते वणीचे आमदार

यवतमाळच्या वणी विधानसभा क्षेत्राचे एकसंघ शिवसेनेचे माजी आमदार राहिलेले विश्वास नांदेकर यांच्यावर गेल्या एक महिन्यांपासून मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. नांदेकर हे आक्रमक शिवसैनिक म्हणून परिचित होते. तालुका प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य ते आमदार असा त्यांचा प्रवास होता. विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेना शिंदे गटात नांदेकर यांनी पक्षप्रवेश केला होता. त्यामुळे ते चंद्रपूर यवतमाळ लोकसभा समन्वयक होते.

दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती खालवली. विश्वास नांदेकर यांच्या निधनाची वार्ता वणीत पोहोचताच राजकीय, सामाजिक क्षेत्रातून सहवेदना व्यक्त होत आहे. वणी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

vishwas nandekar death news
माणिकराव कोकाटे यांना 'सुप्रीम' दिलासा; कोर्टात शिक्षेला स्थिगिती, नेमकं काय घडलं?

'कर्तृत्ववान व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड'

विश्वास नांदेकर यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं की,माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या निधनानं सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारं, सामाजिक बांधिलकी जपणारं एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलंय. माजी आमदार नांदेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सर्वजण सहभागी आहोत'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com