Maharashtra Politics : मतदारांचा घराणेशाहीला सुरुंग; एका घरातले 6 उमेदवार, सहाही पडले

Maharashtra Political news : नगरपरिषदेच्या निवडणुकीत मतदारांनी उमेदवारांच्या घराणेशाहीला चांगलचं उद्धवस्त केलयं... नगरपरिषदेत वेगवेगळ्या पक्षाकडून एकाच कुटुंबात सहा जणांना उमेदवारी देण्यात आली... मात्र त्या सहा उमेदवाराचं नेमकं काय झालं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
maharashtra Politics
bjp Saam tv
Published On

नगरपरिषदेच्या निवडणुकीत मतदारांनी घराणेशाही राबवणाऱ्या उमेदवारांची चांगलीच वाताहात केलीय... निवडणुका जाहीर झाल्यानंतर अनेक ठिकाणी एकाच कुटुंबातील अनेक जणांना उमेदवारी दिल्याचं समोर आलं होतं...त्यात नांदेड आणि बदलापुरमध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी दिली होती. मतदारांनी घराणेशाही चालवणाऱ्या या कुटुंबांना पराभवाचं पाणी पाजलयं....

नांदेड जिल्ह्यात लोहा नगरपालिकेत भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार गजानन सुर्यवंशी यांचा पराभव झालाय... तर नगरसेवक पदाच्या उमेदवार असणाऱ्या त्याच्या पत्नी गोदावरी सुर्यवंशी, भाऊ सचिन सुर्यवंशी, भावजय सुप्रिया सुर्यवंशी, मेहुणा युवराज वाघमारे, भाच्याची पत्नी रीना व्यवहारे यांचा ही पराभव झालाय...

maharashtra Politics
भाजपला सर्वात मोठा झटका; नांदेडमधील एकाच कुटुंबातील ६ भाजप उमेदवारांचा दारुण पराभव, जनतेने घराणेशाही नाकारली

बदलापूर कुळगाव नगरपरिषदेतील शिंदेसेनेचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या पत्नी वीणा म्हात्रे यांचा नगराध्यक्षपदी पराभव झालाय... तर नगरसेवकपदासाठी रिंगणात असणारा त्यांचा मुलगा वरुण म्हात्रे आणि पुतण्या भावेश म्हात्रे यांचाही पराभव झाल्याचं पाहायला मिळतयं...

maharashtra Politics
Akola Election : अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना मोठा हादरा; काँग्रेसने 65 वर्षांची सत्ता उलथवली

खरंतर देशात 149 कुटुंबाकडे तर राज्यात 23 कुटुंबाकडे आमदारकी आणि खासदारकी अशी दोन्ही पदं आहेत... त्यात आणखी 33 आमदार, खासदार, मंत्री आणि माजी मंत्र्यांच्या पत्नी, मुलगी, आई, भाऊ यांना उमेदवारी दिलीय.. हे कमी होतं की काय आता स्थानिक पातळीवर एकाच कुटुंबात उमेदवारीची खैरात वाटण्यात आली.होती... मात्र मतदारांनी एकाच घरातील या सर्व उमेदवारांचा पराभव केल्यानं लोकशाहीच्या उत्सवात घराणेशाहीला सुरुंग लागलाय... असचं म्हणायला हवं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com