Gaming Jihad: दहशतवाद्यांचा 'गेमिंग' जिहाद; मुलांना कट्टरपंथी बनवण्याचा नवा डाव

Gaming Jihad Terror Groups Target Children: आता बातमी पालकवर्गाला सावधान करणारी. तुम्ही तुमच्या मुलांना गेम खेळण्यासाठी मोबाईल देताय का? मग ही बातमी पाहाच. कारण मोबाईल गेमिंग आता दहशतवादी संघटनांच्या 'डिजिटल शिकारी'चं माध्यम बनलंय. पाहूया एक रिपोर्ट.
Gaming Jihad Terror Groups Target Children
Online gaming platforms are emerging as new tools for extremist groups to target and radicalise childrensaamt v
Published On
Summary
  • ऑनलाईन गेमिंगचा वापर करून मुलांना कट्टरपंथी बनवण्याचा नवा डाव

  • दहशतवादी संघटनांची डिजिटल पातळीवर वाढती सक्रियता

  • पालकांनी मुलांच्या मोबाईल वापरावर विशेष लक्ष देण्याची गरज

तुमचा मुलगा सारखा मोबाईल गेम खेळत असेल तर आत्ताच सावध व्हा. कारण मुलांच्या हातातला मोबाईल नुसता मनोरंजनापुरता उरलेला नाहीये तर थेट दहशतवादी संघटनांच्या 'डिजिटल शिकारी'चं माध्यम बनलंय. लोकप्रिय गेमिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून मुलांना कट्टरपंथी बनवण्याचा नवा डाव समोर आलाय. अमेरिकेतल्या एका मीडिया रिपोर्टनुसार, आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आणि जहाल गट मुलांना जाळ्यात ओढण्यासाठी गेमिंग प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत.

Gaming Jihad Terror Groups Target Children
Bangladesh Politics: संविधान बदलण्यास नव्या PM चा नकार; तारिक रहमान यांनी युनूस यांचा प्रस्ताव फेटाळला

तुमच्या मुलांची 'डिजिटल शिकार'?

या दहशतवादी संघटनांकडून 11 ते 17 वयोगटातील मुलं टार्गेट केली जातात

सोशल मीडियावर आकर्षक, कूल वाटणारे मीम्स दाखवून मुलांचं लक्ष वेधतात.

'रोब्लॉक्स' आणि 'माइंडक्राफ्ट' सारख्या लोकप्रिय गेम्समध्ये मैत्री करून मुलांचा विश्वास संपादन करतात.

मुख्य गेम सोडून मुलाला 'प्रायव्हेट सर्व्हर' किंवा सिक्रेट मोडवर बोलावलं जातं.

Gaming Jihad Terror Groups Target Children
मोठी बातमी! मुख्यमंत्री मान अ‍ॅडमिट असलेल्या हॉस्पिटलला बॉम्बने उडवण्याची धमकी, पंजाबमध्ये अलर्ट

'डिस्कॉर्ड' सारख्या एनक्रिप्टेड चॅटवर नेऊन मुलांना कट्टरपंथी विचारांचं ट्रेनिंग नंतर आभासी जगातून बाहेर काढून विघातक कृत्यांसाठी ब्रेनवॉशिंग केलं जातं.

सोशल मीडियावरील सुरक्षेमुळे दहशतवादी संघटनांनी आता गेमिंग विश्वाकडे आपला मोर्चा वळवलाय.. रोब्लॉक्स'सारख्या गेम्समध्ये युजरने तयार केलेली सामग्री इतकी प्रचंड आहे की, स्वयंचलित सिस्टमद्वारे त्यावर नजर ठेवणे जवळपास अशक्य आहे. या पार्श्वभूमीवर पालकांनीच अधिक जागरूक राहिलं पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com