मोठी बातमी! मुख्यमंत्री मान अ‍ॅडमिट असलेल्या हॉस्पिटलला बॉम्बने उडवण्याची धमकी, पंजाबमध्ये अलर्ट

Punjab on Alert Bomb Threat : फोर्टिस हॉस्पिटल आणि एका शाळेला बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली आहे. या धमकीमुळे मोहालीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान सध्या रुग्णालयात दाखल आहेत. चौकशी सुरू आहे.
Punjab on Alert Bomb Threat :
Police security increased at Fortis Hospital Mohali in Mohali after bomb threat.saam tv
Published On
Summary
  • मोहालीतील शाळा आणि फोर्टिस हॉस्पिटलमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी

  • मुख्यमंत्री भगवंत मान रुग्णालयात दाखल असल्याने तणाव वाढला

  • पोलिस, बॉम्ब निकामी पथक आणि श्वान पथकाची सखोल तपासणी

पंजाबमधील मोहाली येथील शाळा आणि फोर्टिस हॉस्पिटलमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमकीमुळे खळबळ उडाली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुख्यमंत्री भगवंत मान हे देखील या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. वृत्तानुसार खबरदारीचा उपाय म्हणून शाळा परिसर आणि रुग्णालयाभोवती मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. धमकी येताच तपास यंत्रणा कामाला लागली. बॉम्ब निकामी करणारे पथक आणि श्वान पथकाकडून सखोल तपासणी करण्यात आली. संपूर्ण परिसरात संशयास्पद वस्तूंचा कसून शोध घेतला जात आहे.

Punjab on Alert Bomb Threat :
CM Helicopter: हवेत झेपावताच मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचं नियंत्रण सुटलं; वरती जाण्याऐवजी खाली आलं अन्...

भगवंत मान यांच्यावर उपचार सुरू

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान गेल्या दोन दिवसांपासून मोहालीतील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. यामुळे हॉस्पिटलच्या परिसरात तणाव निर्माण झाला असून कडक बंदोबस्त करण्यात आलाय. याप्रकरणी पोलिसांनी प्रतिक्रिया दिली आहे, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिस्थिती नियंत्रणात असून याप्रकरणी गांभीर्याने तपास केला जातोय. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केलंय.

Punjab on Alert Bomb Threat :
Punjab CM : मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली; फोर्टिस रुग्णालयात दाखल

याआधीही पंजाब, मोहाली आणि चंदीगडमध्ये बॉम्ब स्फोट घडवण्याच्या धमक्या आल्या आहेत. अद्याप या अशा धमक्या देणाऱ्यांना अटक झाली नाहीये. पोलीस नेहमी तपास केला जातोय असं म्हणतात, पण अद्याप कोणतीच कारवाई झाली नाहीये. या सततच्या धमक्यांमुळे लोकांमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण आहे. भगवंत मान यांना सोमवारी मोहालीतील फोर्टिस हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.

परंतु सोमवारी रात्री परत त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा दाखल करण्यात आले. थकवा जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी थकवा जाणवू लागल्याने मान यांना मोहालीतील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. मान यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com