Political News: भाजपला मोठा धक्का, माजी केंद्रीय मंत्री स्थापन करणार नवा पक्ष; राजकारणात खळबळ

R.K. Singh Announces New Political Party: भाजपच्या दिग्गज नेत्याने नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. माजी केंद्रीय मंत्री आर के सिंह आता स्वत:चा राजकीय पक्ष स्थापन करणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Political News: भाजपला मोठा धक्का, माजी केंद्रीय मंत्री स्थापन करणार नवा पक्ष; राजकारणात खळबळ
BJP News Saam tv
Published On

Summary -

  • आर के सिंह यांनी भाजप सोडल्यानंतर नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली

  • या पक्षाचा फोकस बिहारच्या राजकारणावर असेल

  • प्रामाणिक आणि सुशिक्षित नेत्यांना एकत्र आणण्याचा या पक्षाचा उद्देश असेल

  • स्पष्टवक्तेपणामुळे पक्षातून निलंबन झाल्याचा दावा त्यांनी केला

देशामध्ये आता आणखी एका नव्या राजकीय पक्षाची स्थापना होणार आहे. माजी केंद्रीय मंत्र्याने याबात मोठी घोषणा केली. माजी केंद्रीय मंत्री आर के सिंह आता स्वत:चा राजकीय पक्ष स्थापन करणार आहेत. माजी सनदी अधिकारी ते राजकारणी बनलेले आर के सिंह यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर ५ महिन्यांनंतर नव्या पक्षाची स्थापन करणार असल्याचे जाहीर केले. एका मुलाखतीमध्ये त्यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगतिले की, त्यांचा प्रस्तावित पक्ष प्रामाणिक, सुशिक्षित, जातिनिरपेक्ष व्यक्तींना एकत्र आणेल. हा नवा पक्ष बिहारच्या राजकारणावर लक्ष केंद्रित करेल.

आर के सिंह हे १२ वर्षे भाजपमध्ये होते. सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण पक्षाकडून निलंबित करण्यात आल्यानंतर त्यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये भाजप पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. आर के सिंह हे कंद्रीय गृहसचिव देखील होते. मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून देखील त्यांनी काम केले आहे.

Political News: भाजपला मोठा धक्का, माजी केंद्रीय मंत्री स्थापन करणार नवा पक्ष; राजकारणात खळबळ
Political News: अमित शहांच्या रोड शोदरम्यान राडा, TMC अन् BJP कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी; एकमेकांची डोकी फोडली

आरा येथील माजी लोकसभा खासदाराने सांगितले की, आर के सिंह यांना काही विशिष्ट मुद्द्यांवर स्पष्टपणे बोलण्याची सवयी आहे. याच सवयीमुळे त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. आर के सिंह यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'मी स्पष्टपणे बोलतो त्यामुळे मला निलंबित केले. पण मी स्पष्टपणे बोलण्याची ही पहिली वेळ नव्हती. मी खासदार असतानाही स्पष्ट बोलत होतो.'

Political News: भाजपला मोठा धक्का, माजी केंद्रीय मंत्री स्थापन करणार नवा पक्ष; राजकारणात खळबळ
Karnataka Vidhan Sabha Election Results: कर्नाटक निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला नाकारलं; बेळगावात कोणी मारली बाजी?

आर के सिंह यांनी पीएम मोदी यांचे नाव घेत सांगितले की, 'माझी मते स्पष्टवक्ती असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला सात वर्षे ऊर्जामंत्री ठेवले. ही एक मोठी गोष्ट होती. माझ्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात पंतप्रधान कार्यालयाकडून माझ्या मंत्रालयात कोणताही हस्तक्षेप झाला नाही आणि मला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले होते. भाजपकडून माझे निलंबन ही शिक्षा आहे असे मी मानत नाही.'

Political News: भाजपला मोठा धक्का, माजी केंद्रीय मंत्री स्थापन करणार नवा पक्ष; राजकारणात खळबळ
BJP Leader Killing Case : भाजप नेत्याची हत्या; काँग्रेस आमदाराला जन्मठेपेची शिक्षा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com