
नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. डॉ. मनमोहन सिंह यांनी गुरुवारी रात्री ९:५१ वाजता अखेरचा श्वास घेतला. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांचं निधन झालं. मनमोहन सिंह यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ते पंतप्रधान अशा विविध भूमिकांवर स्वत:चा वेगळा ठसा उमटवला. डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर राष्ट्रपती द्रोपद्री मुर्मू, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही देशाचे 'अर्थ'चक्र निखळल्याची भावना सोशल मीडियावर पोस्ट करत व्यक्त केल्या.
'भारतातील प्रतिष्ठित नेत्यांमधील व्यक्तिमत्व हरपलं, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. ते सर्वसामान्य कुटुंबातून प्रतिष्ठित अर्थतज्ज्ञ झाले. त्यांनी पंतप्रधान, अर्थमंत्रिपदासहित विविध सरकारी पदावर काम केलं. त्यांनी आर्थिक विचारांची छाप भारताच्या आर्थिक धोरणार सोडली, अशा भावना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहित अनेक काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं की, डॉ. मनमोहन सिंह हे फार वेगळं राजकीय व्यक्तिमत्व होतं. त्यांनी शिक्षण आणि प्रशासनात मोठं योगदान दिलं. विविध पदावरून भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यास महत्वाचं योगदान दिलं. त्यांनी केलेली राष्ट्रसेवा, राजकीय जीवन आणि त्यांची विनम्रता आमच्या नेहमी स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने देशाचं सर्वात मोठं नुकसान झालं आहे. भारताच्या महान नेत्याला श्रद्धांजली अर्पण करते'.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी म्हणाले, 'मनमोहन सिंह यांनी बुद्धिमता आणि प्रामाणिकपणे भारताचं नेतृत्व केलं. त्यांची विनम्रता आणि अर्थशास्त्रातील समज भारताला नेहमी प्रेरणा देत राहील. श्रीमती कौर आणि त्यांच्या कुटुंबीयाप्रती संवेदना व्यक्त करतो. मी माझ्या मार्गदर्शकाला गमावलं. आमच्यातील लाखो लोक त्यांचे चाहते होते. आम्ही अभिमानाने त्यांची आठवण काढू'.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने एक उमदा प्रशासक, अर्थतज्ञ गमावला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री, पंतप्रधान अशा विविध भूमिकांमधून त्यांनी काम केले. त्यांनी देशवायिसांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. भारताच्या राजकारणात स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अर्थशास्त्राशी संबंधित विपूल लेखन सुद्धा केले. मनमोहन सिंह यांनी केलेले कार्य कायम देशवासियांच्या स्मरणात राहील. मी मनमोहन सिंह यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि चाहत्यांच्या दु:खात सहभागी आहे. हे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना लाभो, अशी प्रार्थना करतो'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.