Rahul Gandhi: RSSची विचारसरणी असलेल्यांना पक्षातून काढावं लागेल: राहुल गांधी

Rahul Gandhi CWC Meeting : काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत मोठे विधान केलं.
Congress CEC Meeting
Rahul Gandhi Saam tv
Published On

राहुल गांधी यांनी पुन्हा एकादा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केलेत. कर्नाटकच्या बेलही त्यांनी निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद असल्याचं त्यांनी म्हटलंय. महाराष्ट्रात ११८ जागांवर नवे मतदार जोडले गेले, त्यापैकी भाजपने १०२ जागा जिंकल्या. या जागांवर ७२ लाख मतदार जोडले गेलेत. लोकसभा निवडणुकीत मतदार यादी होती.

विधानसभा निवडणुकीत त्यात मोठा बदल झाला असून यातून अगदी स्पष्ट आहे की, कुठेतरी काहीतरी गडबड असल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय. ते काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते. मल्लिकार्जुन खरगे यांनी फेसबुकवर या भेटीबाबत पोस्ट करत लिहिले की, या बैठकीत काँग्रेसजनांनी पक्ष आणि देशाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. आपण सर्व मिळून बापूंची विचारधारा आणि आदर्श सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवू आणि द्वेषाच्या राजकारणाला सत्य आणि अहिंसेने पराभूत करू. जय बापू, जय भीम, जय संविधान.

Congress CEC Meeting
Sanjay Shirsat: राहुल गांधी परभणीत राजकारणासाठी, सूर्यवंशी कुटुंबाशी त्यांना देणं-घेणं नाही; शिवसेनेचं प्रत्युत्तर

दरम्यान, या बैठकीत त्यांनी काँग्रेस पक्षात मोठी उलटफेर केली जाईल, याचे संकेत दिलेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत 'नव सत्याग्रह' बैठक झाली. पक्षातील आरएसएस विचारवाल्या नेत्यांना काढून टाकावे लागेल, असं काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणालेत. पक्षात RSS विचारधारा असलेल्या लोकांच्या उपस्थितीवर प्रश्न उपस्थित केला.

Congress CEC Meeting
Devendra Fadnavis : राहुल गांधी द्वेष पसरवताहेत, त्यासाठीच परभणीत आले; सूर्यवंशी प्रकरणी आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर

आमच्या पक्षात ज्यांचा आरएसएसचा विचार आहे, त्यांना आधी शोधून काढून टाकावे लागेल, असे ते म्हणाले. "नव सत्याग्रह बैठक" नावाची CWC बैठक गुरुवारी बेळगावी येथे सुरू झाली. महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बेळगाव अधिवेशनाचा हा पक्ष १००वा वर्धापन दिन साजरा करत आहे. या बैठकीत २०२५ मधील राजकीय आणि निवडणूक आव्हानांचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.

Congress CEC Meeting
BJP Donation: भाजपला २२४४ कोटींची देणगी, काँग्रेस तिसऱ्या स्थानी, कोणत्या पक्षाला किती रक्कम मिळाली?

CWC सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत निर्णय घेण्यात आला, भाजपच्या धर्माच्या राजकारणाचा मुकाबला करण्यासाठी, काँग्रेसने तेलंगणाच्या धर्तीवर आपली सत्ता असलेल्या प्रत्येक राज्यात जात जनगणना करावी. हे मोठ्या प्रमाणावर घेतले पाहिजे.

महाराष्ट्रातील निवडणुकांच्या निकाल संशयाच्या भोवऱ्यात

राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केलाय. कर्नाटकची बेलही निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद असल्याचे म्हटले. महाराष्ट्रात ११८जागांवर मतदार जोडले गेलेत, त्यात भाजपने १०२ जागा जिंकल्या. या जागांवर ७२ लाख मतदार जोडले गेले. लोकसभा निवडणुकीत मतदार यादी होती. विधानसभा निवडणुकीत त्यात मोठा बदल झाल्याचं राहुल गांधी म्हणाले. याबैठकीनंतर गौरव गौगोई म्हणाले की, भारत जोडो यात्रेप्रमाणे राहुल गांधींना जिल्हास्तरावर जाऊन जनतेला आणि कार्यकर्त्यांना भेटावे लागेल, आपण राहुल गांधींना संसदेत, सभांमध्ये भेटतो, पण सामान्य कार्यकर्ता त्यांना भेटू शकत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com