Manmohan Singh : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे ९२ व्या वर्षी निधन

Dr. Manmohan Singh passes away : पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मनमोहन सिंग यांना आज संध्याकाळी इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते.
Dr. Manmohan Singh passes away
Breaking News: भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधनSaam TV
Published On

Dr. Manmohan Singh passes away : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन झालंय. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रात्री आठ वाजता त्यांची तब्येत खालावली होती. त्यांना श्वसानाचा त्रास होऊ लागला होता, त्यानंतर त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. मनमोहन सिंग हे २००४ ते 2014 दरम्यान काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारचे पंतप्रधान होते.

मनमोहनसिंग यांना श्वसनाचा त्रास होत होता. त्यानंतर त्यांना रात्री ८ वाजता दिल्लीच्या एम्स मध्ये दाखल करण्यात आले होते. संध्याकाळी बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना तात्काळ एम्समध्ये आणण्यात आले. मात्र मनमोहन सिंग यांना वाचवण्यात डॉक्टरांना यश आले नाही. एम्सच्या माहितीनुसार मनमोहन सिंग यांना गुरुवारी रात्री ९.५१ वाजता मृत घोषित करण्यात आले.

भारताचे १४ वे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना देशातील आर्थिक सुधारणांचे जनक मानले जाते. त्यांच्या निधनानंतर देशात शोककळा परसलीय. देशातील अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान १९९१ मध्ये अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग यांनी भारतात आर्थिक उदारीकरणाचा पाया घातला, ज्यामुळे जागतिक स्तरावर देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली.

मनमोहन सिंग यांनी २२ मे २००४ रोजी देशाची कमान हाती घेतली. त्यांनी पंतप्रधान म्हणून सलग दोन टर्म पूर्ण केले. मनमोहन यांनी एकूण ३,६५६ दिवस सत्तेच्या गादीवर विराजमान होते. त्यांची गणना काँग्रेसच्या अशा नेत्यांमध्ये केली जाते. विरोधी पक्षांनीही त्यांचा आदर केला. मनमोहन सिंग शांत स्वभावाचे होते.

मनमोहन यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

माजी पंतप्रधानांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्ट केले. 'भारतातील सर्वात प्रतिष्ठित नेते डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने शोक व्यक्त केला जात आहे. सामान्य पार्श्वभूमीतून वरती येत ते एक प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ बनले. त्यांनी अर्थमंत्र्यांसह विविध सरकारी पदे भूषवली आणि गेल्या काही वर्षांत त्यांनी आमच्या आर्थिक धोरणावर खोलवर छाप सोडली. संसदेतील त्यांचा हस्तक्षेपही अतिशय व्यावहारिक होता. आपले पंतप्रधान या नात्याने त्यांनी लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी व्यापक प्रयत्न केले.

'डॉ. मनमोहन सिंग आणि मी ते पंतप्रधान असताना आणि मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना नियमित बोलायचे. राज्यकारभाराशी संबंधित विविध विषयांवर आमची सखोल चर्चा व्हायची. त्यांची बुद्धिमत्ता आणि नम्रता नेहमीच दिसून येत होती. या दुःखाच्या प्रसंगी, माझ्या संवेदना डॉ. मनमोहन सिंग जी यांच्या कुटुंबियांसोबत, त्यांचे मित्र आणि असंख्य प्रशंसक आहेत. ओम शांती.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com