Divya Mittal: IAS पदाचा तडकाफडकी राजीनामा, राजकारणात एन्ट्री करत नव्या पक्षाची स्थापना; भाजपचं टेन्शन वाढलं

Uttar Pradesh Assembly Election: माजी आयएएस अधिकारी दिव्या मित्तल यांनी नव्या पक्षाची घोषणा केली. त्या विधानसभा निवडणूक लढवणार आहेत.
Divya Mittal: IAS पदाचा तडकाफडकी राजीनामा, राजकारणात एन्ट्री करत नव्या पक्षाची स्थापना; भाजपचं टेन्शन वाढलं
Divya MittalSaam Tv
Published On: 
  • दिव्या मित्तल यांनी आयएएस पद सोडून राजकारणात प्रवेश केला

  • दिव्या मित्तल यांनी जननीति भारत पक्षाची स्थापना केली

  • दिव्या मित्तल मिर्झापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार

आयएएस पदाची नोकरी सोडून राजकारणात एन्ट्री करणाऱ्या दिव्या मित्तल यांनी आज मोठी घोषणा केली. दिव्या मित्तल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत निवडणूक लढवण्याची घोषणा केली. यासोबतच त्यांनी आपला नवीन पक्ष 'जननीति भारत'ची स्थापना करण्यात आल्याचे देखील जाहीर केले. यावेळी त्यांनी सांगितले की, राजकारण तुमच्यावर राज करते. पण माझा हा पक्ष तुमच्यासाठी बनला आहे.

आयएएस पद सोडून राजकारणात आलेल्या दिव्या मित्तल उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्या मिर्झापूरमधून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. दिव्या मित्तल यांनी आपल्या पक्षाच्या नावाची घोषणा करताना त्याची ३ आश्वासने जनतेला सांगितली आणि याच आधारावर त्या जनतेच्या हितासाठी काम करतील. त्या म्हणाल्या की, पहिले आश्वासन म्हणजे जन ते निती आणि निती ते भारत.

दुसरे आश्वासन म्हणजे, प्रत्येक निर्णय गरज पाहूनच घेतला जाईल. तिसरे आश्वासन म्हणजे, गरजेवर आधारित निर्णय आणि निर्णयात समानता. या नवीन राजकीय उपक्रमांतर्गत देशाच्या धोरणांच्या केंद्रस्थानी सामान्य जनतेला ठेवण्यावर भर देण्यात आला असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Divya Mittal: IAS पदाचा तडकाफडकी राजीनामा, राजकारणात एन्ट्री करत नव्या पक्षाची स्थापना; भाजपचं टेन्शन वाढलं
Maharashtra Politics: ठाकरेसेनेतून शिंदे गटात गेले, आता जाहीर नाराजी बोलून दाखवली; शिंदे संतापून म्हणाले, विचार करावा लागेल!

दिव्या मित्तल यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये सांगितले की, 'जेव्हा मी राजकारणात येण्याचे सांगितले होते तेव्हा एक मोबाईल नंबर सांगितला होता. त्यावर तुम्ही लोकांनी खूप मेसेज केले आणि मला पाठिंबा दिला. मी एक पक्ष स्थापन करत आहे. माझ्या पक्षाचे नाव जननीति भारत असणार आहे. माझ्या पक्षात प्रत्येक व्यक्तीला जोडले जाईल. जननीति भारतमध्ये राज तुमचे असेल. माझा पक्ष उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक लढेल. माझ्या पक्षाचे निवडून येणारे आमदार नागरिकांच्या दारात जाऊन काम करतील. आम्हाला राजकारण नको, आम्हाला सामाजिक धोरणांसाठी काम करयाचे आहे. माझ्या पक्षामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे आणि पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी जनतेला केले.

Divya Mittal: IAS पदाचा तडकाफडकी राजीनामा, राजकारणात एन्ट्री करत नव्या पक्षाची स्थापना; भाजपचं टेन्शन वाढलं
Maharashtra Politics: भाजपची मोठी खेळी! एकनाथ खडसेंना मोठा धक्का, बाजार समितीची सत्ता हातून गेली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com