IAS officers Transfer: पुन्हा मोठा प्रशासकीय फेरबदल, ७ आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Uttar Pradesh IAS Officer Transfrer: योगी सरकारकडून प्रशासकीय बदल्यांचा धडाका सुरूच आहे. ७ आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या. कुणाची कुठे नियुक्ती केली ते घ्या जाणून...
IAS officers Transfer: पुन्हा मोठा प्रशासकीय फेरबदल, ७ आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या
IAS OFFICERS TRANSFERRED IN UTTAR PRADESHsaam tv
Published On: 
  • उत्तर प्रदेशमध्ये 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

  • योगी सरकारकडून प्रशासकीय बदल्यांचा धडाका सुरूच

  • बुधवारी रात्री आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जाहीर करण्यात आली

  • आझमगड आणि आग्रा येथील मुख्य विकास अधिकाऱ्यांच्या बदल्या

उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोठा प्रशासकीय फेरबदल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून योगी सरकारकडून बदल्यांचा सपाटा सुरूच आहे. बुधवारी रात्री उशिरा योगी सरकारने ७ आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या. वैद्यकीय, आरोग्य, महसूल, शहरी रोजगार आणि पंचायती राज यांसारख्या विभागांमध्ये बदल करण्यात आले आहेत. पंचायती राज संचालकांसह आझमगड आणि आग्रा येथील मुख्य विकास अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. योगी सरकारने या बदल्याचे अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. या वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.

वैद्यकीय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे विशेष सचिव धीरेंद्र सिंह सचन यांची पंचायती राज विभागाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. आझमगडचे मुख्य विकास अधिकारी राकेश कुमार पटेल यांची वैद्यकीय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या विशेष सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या जागेवर मुझफ्फरनगरचे मुख्य विकास अधिकारी कांडारकर कमलाकिशोर देशभूषण यांची आझमगडचे नवे मुख्य विकास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

IAS officers Transfer: पुन्हा मोठा प्रशासकीय फेरबदल, ७ आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या
मोठी बातमी! राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे झाली बदली?

आग्रा विभागाचे अतिरिक्त आयुक्त राजेश कुमार यांची शहरी रोजगार आणि दारिद्य निर्मूलन विभागाचे विशेष सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. आग्राच्या मुख्य विकास अधिकारी प्रतिभा सिंह यांच्याकडे आग्रा विभागाच्या अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांच्या जागेवर कानपूर देहातचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अमित कुमार यांची आग्राचे नवीन मुख्य विकास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर प्रयागराजमधील महसूल परिषद सदस्य देवेंद्र कुमार सिंह कुशवाह यांना प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले आहे.

IAS officers Transfer: पुन्हा मोठा प्रशासकीय फेरबदल, ७ आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या
MPSC मध्ये तुकाराम मुंढेंनंतर आणखी एका IAS अधिकाऱ्याची एन्ट्री, कुणाकडे दिली सचिवपदाची सूत्रे?

या ७ आयएएस अधिकाऱ्यांच्या कुठे बदल्या?

१) धीरेंद्रसिंग सचान - पंचायती राजचे संचालक

२) राकेश कुमार पटेल - विशेष सचिव, वैद्यकीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग.

३) के. के देशभूषण - मुख्य विकास अधिकारी (CDO), आझमगड.

४)राजेश कुमार – विशेष सचिव, शहरी रोजगार आणि दारिद्र्य निर्मूलन विभाग.

५) प्रतिभा सिंह - आग्रा विभागाचे अतिरिक्त आयुक्त

६) अमित कुमार - मुख्य विकास अधिकारी (सीडीओ), आग्रा.

७) देवेंद्र कुमार सिंह कुशवाहा - बदल्यांच्या यादीत नाव पण त्यांना प्रतीक्षा यादीत ठेवले.

IAS officers Transfer: पुन्हा मोठा प्रशासकीय फेरबदल, ७ आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या
IAS Officer Transfer: मोठा प्रशासकीय फेरबदल! २३ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; ११ जिल्ह्यांना मिळाले नवे कलेक्टर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com