Manasvi Choudhary
थंड आणि गरम पाण्याने आंघोळ आपण सर्वजण करतो परंतु, तुम्ही कधी बर्फाच्या पाण्याने आंघोळ करण्याचे ऐकलं आहे का?
आजकाल अनेक फिटनेसप्रेमी बर्फाच्या पाण्याने आंघोळ करतात. अनेक सेलिब्रिटी, फिटनेस प्रेमी 'आइस बाथ थेरपी' घेतात.
पण तुम्हाला बर्फाच्या पाण्याने आंघोळ करण्याचे नेमके फायदे काय होतात? ते माहितीयेत का?Muscle Recovery
रोजच्या धावपळीतून अनेकदा आरोग्याकडे आपले लक्ष नसते यासाठी आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा तुम्ही बर्फाच्या पाण्याने आंघोळ केली की स्नायू मोकळे होतात. शरीर रिलॅक्स होते.
बर्फाच्या पाण्याने आंघोळ केल्याने रक्ताचा पुरवठा सुधारतो. संपूर्ण शरीराला पुरेसे ऑक्सिजन मिळते. शरीर सृदृढ राहते.
थंड पाण्यामुळे शरीरातील थकवा, ताण दूर होण्यास मदत होते. एनर्जी वाढते.
नियमितपणे थंड पाण्याने आंघोळ केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि संसर्गजन्य आजार दूर होतात.
गरम पाण्यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल नष्ट होते आणि त्वचा कोरडी पडते. याउलट, थंड पाण्यामुळे त्वचेवरील ओपन पोअर्स टाईट होतात, ज्यामुळे त्वचा चमकदार बनते.
येथे दिलेली महिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.