

राज्य सरकारने 3 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. डॉ. मंजिरी मनोलकर, शुभम गुप्ता आणि डॉ. भालचंद्र चव्हाण यांना नव्या पदांवर नियुक्त करण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. या बदल्यांमुळे महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ आणि बुलढाणा जिल्हा परिषदेतील प्रशासकीय जबाबदाऱ्यांमध्ये बदल होणार आहेत.
सरकारनं समोवारी रात्री 12 ऑक्टोबर 2026 रोजीच्या बदली आदेश जाहीर केलेत. राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांना नवीन पदस्थापना देण्यात आलीय. या आदेशात पुणे, मुंबई आणि बुलढाणा येथील विविध प्रशासकीय पदांचा समावेश आहे
या पुणे येथील महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदावर कार्यरत होत्या. शासनाच्या नव्या आदेशानुसार त्यांची नियुक्ती पुणे येथील पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आलीय. या नियुक्तीमुळे पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाच्या कामकाजाची जबाबदारी आता त्यांच्याकडे असणार आहे. या महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विकासकामांच्या प्रशासकीय समन्वयात त्यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे.
शुभम गुप्ता हे पुणे येथील पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. आता त्यांची मुंबई येथील उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आलीय.
या बदलीमुळे पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी नव्याने डॉ. मंजिरी मणोलकर यांच्याकडे सोपविण्यात आलीय. तर शुभम गुप्ता यांच्याकडे उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या सदस्य सचिवपदाची जबाबदारी असणार आहे.
डॉ. भालचंद्र प्रताप चव्हाण हे मुंबईतील महसूल व वन विभागात आपत्ती व्यवस्थापन संचालक म्हणून कार्यरत होते. शासनाच्या बदली आदेशानुसार त्यांची बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आलीय. या नियुक्तीनंतर बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्रशासन, ग्रामीण विकासाशी संबंधित कामकाज आणि विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीशी संबंधित जबाबदाऱ्या त्या संभाळतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.