Bihar Election Result : बिहारचा पहिला अधिकृत निकाल; JDU च्या उमेदवाराचा मोठ्या फरकाने विजय

Bihar Election Result update : बिहारचा पहिला अधिकृत निकाल लागला आहे. JDU च्या उमेदवाराचा मोठ्या फरकाने विजय झालाय.
Bihar Election
Bihar Election Result Saam tv
Published On
Summary

बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिला अधिकृत निकाल समोर

पहिला निकाल एनडीएच्या बाजूने

जनता दल यूनायटेडचे उमेदवार महेश्वर हजारी विजयी

बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिला अधिकृत निकाल समोर आला आहे. बिहारचा पहिल निकाल हा एनडीएच्या बाजूने लागला आहे. एनडीएच्या जनता दल यूनायटेडचे उमेदवार महेश्वर हजारी यांचा मोठ्या फरकाने विजय झाला आहे.

Bihar Election
Beed Politics : बीडमध्ये मुंडे भावाबहिणीची युती, परळी नगरपरिषद राखण्यात यश मिळणार का? VIDEO

जनता दल यूनायडेटचे महेश्वर हजारी यांचा कल्याणपूर विधानसभा मतदारसंघात ३८ हजार मतांनी जिंकले. महेश्वर हजारी यांनी कमुनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या रणजीत कुमार राम यांचा पराभव केला. जनता दल यूनायटेडच्या पहिल्या निकालानंतर आता इतर मतदारसंघातील निकाल समोर येऊ लागले आहेत.

कल्याणपूरनंतर अलौली, हरनौत, मोकामा, बेलागंज या जागांवर जनता दल यूनायटेडच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. जनता दल यूनायडेटचे हरी नारायण सिंह, अनंत कुमार सिंह, मनोराम देव, राम चंद्र सदा यांचा विजय झाला आहे. पाच पैकी ४ उमेदवार हे मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत.

Bihar Election
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या eKYC साठी मुदतवाढ मिळणार का? महत्वाची माहिती समोर

भाजपच्या तीन उमेदवारांचा देखील विजय झाला आहे. मधुबन, बरुराज आणि साहेबगंज विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार जिंकले आहेत. राणा रणधीर, अरुण कुमार सिंह आणि राजू कुमार सिंह हे तिन्ही उमेदवार जिंकले आहेत. राणा रणधीर हे ५ हजारांहून अधिक मतांनी जिंकले आहेत. त राजू कुमार सिंह हे १३ हजारांहून अधिक मतांनी जिंकले आहेत. तर बरुराज विधानसभा मतदारसंघातून अरुण कुमार सिंह जिंकले आहेत.

Bihar Election
Delhi Blast : 'दिल्ली स्फोट दहशतवादी हल्लाच'; केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये, घेतला मोठा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com