Shocking : भीषण अग्नितांडव! दोन शाळा जळून खाक, २९ जणांचा मृत्यू

DR Congo Bukavu School Fire : DR Congo मधील बुकावू शहरात भीषण आग लागून २९ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींचा समावेश असून ३०० लाकडी घरे आणि दोन शाळा जळून खाक झाल्या.
DR Congo Bukavu Fire: 29 Dead, Students Among Victims
DR Congo Bukavu Fire: 29 Dead, Students Among VictimsSaam Tv
Published On
Summary
  • DR Congo मधील बुकावू शहरात भीषण आग

  • २९ जणांचा होरपळून मृत्यू

  • आगीमुळे सुमारे ३०० लाकडी घरे आणि दोन शाळांचे मोठे नुकसान

  • अनेक जखमींवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू

डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (DRC) मधील बुकावू शहरात भीषण आगीची घटना घडली आहे. या दुर्घटनेत २९ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान अग्नितांडवामध्ये अडकलेल्या इतरांना काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुकावूच्या चिंपुंडा परिसरात गुरुवारी सकाळी सुमारे ८ वाजता आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण करत आसपासच्या भागाला वेढले. या आगीची झळ उजामा प्राथमिक शाळा आणि फुराह माध्यमिक शाळेलाही बसली. आगीमुळे मोठ्या प्रमाणावर धूर पसरल्याने अनेक विद्यार्थ्यांना श्वास घेण्यास त्रास झाला. AFC/M23 या बंडखोर संघटनेचे प्रवक्ते लॉरेंस कॅन्यूका यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये १९ मुली आणि ५ मुले असल्याचे समोर आले आहे. मात्र स्थानिक माध्यमांनी मृतांचा आकडा अद्याप प्राथमिक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

DR Congo Bukavu Fire: 29 Dead, Students Among Victims
Ayurveda Benefits : सर्दी-खोकला झटक्यात नाहीसा, डिप्रेशनवरही मात;जाणून घ्या 'या' आयुर्वेदिक वनस्पतींचे फायदे

आग लागल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये मोठी भीती निर्माण झाली. बाहेर पडण्यासाठी विद्यार्थ्यांनी धावपळ केल्याने चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. काही विद्यार्थी एकमेकांच्या पायाखाली आले, तर काहींनी जीव वाचवण्यासाठी मिळेल त्या मार्गाने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. या गोंधळात अनेक जण बेशुद्ध पडले. स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आगीमध्ये सुमारे ३०० लाकडी घरे आणि दोन शाळा जळून खाक झाल्या आहेत. स्थानिक रुग्णालयांमध्ये मोठ्या संख्येने जखमींवर उपचार सुरू आहेत. AFC/M23 च्या माहितीनुसार, २९ जण रुग्णालयात उपचार घेत असून त्यापैकी २१ जण अतिदक्षता विभागात आहेत.

DR Congo Bukavu Fire: 29 Dead, Students Among Victims
Gavar Side Effects : गवार खाणं 'या' लोकांसाठी ठरू शकत धोकादायक! 'ही' ६ कारणे वेळीच घ्या जाणून

स्थानिक क्लिनिकमधील एका परिचारिकेने सांगितले की, सुमारे ५० विद्यार्थी आणि काही शिक्षक गंभीर अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले होते. काहींचा घटनास्थळीच, तर काहींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आपत्कालीन पथकांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली असून, या दुर्घटनेचा तपास सुरू आहे. बुकावूमध्ये गेल्या काही दिवसांत आगीच्या अनेक घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com