मोठी बातमी! भाजप खासदाराला अटक होणार, २ अजामीनपात्र गुन्हे दाखल; महिलांवर अत्याचार अन् भ्रष्ट्राचाराचा आरोप

Punjab political controversy : आप सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर संदीप पाठक यांच्यावर पंजाबमध्ये अजामीनपात्र गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
Sandeep Pathak
Sandeep Pathak
Published On

Sandeep Pathak FIR Punjab details after joining BJP : राघव चड्ढा यांच्यासह 'आप'मधून भाजपात दाखल झालेल्या खासदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्यावर पंजाबमध्ये कारवाई सुरू झाली आहे. खासदार संदीप पाठक यांच्यावरही पंजाबमध्ये २ गुन्हे दाखल झाले असून ते अजामीनपात्र आहेत. पाठक यांनी 'आप' सोडून भाजपमध्ये प्रवेश करताच ही कारवाई सुरू झाली.

सूत्रांनुसार, महिलांवरील अत्याचार आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये पंजाबच्या दोन जिल्ह्यांमध्ये हे एफआयआर (FIR) दाखल करण्यात आले आहेत. आता त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. विशेष म्हणजे, पंजाब पोलिसांच्या एका पथकाने संदीप पाठक यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी भेट दिली होती, परंतु अधिकारी पोहोचण्यापूर्वीच ते तेथून निघून गेले होते.

पंजाब पोलिसांनी राज्यसभेचे खासदार संदीप पाठक यांच्या विरोधात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अजामीनपात्र कलमांखाली २ गुन्हे दाखल केले आहेत. महिलांवरील अत्याचार आणि भ्रष्टाचाराचे आरोप ठेवत त्यांच्यावर हे गुन्हे दाखल झाले आहेत. संदीप पाठक यांना अटक करण्यासाठी पंजाब पोलीस त्यांच्या घरीही पोहोचले होते. पाठक यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर भाजप आणि शिरोमणी अकाली दलाकडून ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Sandeep Pathak
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना सरकार मोठं गिफ्ट देणार, एकाचवेळी खात्यात खटाखट ₹४५०० येणार? वाचा अपडेट

भगवंत मान यांच्या 'आप' सरकारने पोलिसांचा गैरवापर केल्याचा आरोप पंजाब भाजपचे कार्याध्यक्ष अश्वनी शर्मा यांनी केला आहे. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये शर्मा म्हणाले की, "पंजाबमध्ये आता कायदा राहिला नाही. राजकीय सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. भगवंत मान आणि केजरीवाल यांची भीती उघड झाली आहे. राज्यसभा खासदार संदीप पाठक यांनी 'आप' सोडून भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात आले. केजरीवाल आणि भगवंत मान हे पोलिसांचा वापर राजकीय शस्त्र म्हणून करत असल्याचे स्पष्ट दिसतेय."

Sandeep Pathak
Plane Crash : खेळाडूंना घेऊन जाणारे विमान झाडांवर कोसळले; ५ जणांचा मृत्यू

स्थानिक सूत्रांनुसार, महिलांवरील अत्याचार आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये २ जिल्ह्यांमध्ये एफआयआर दाखल झाले आहेत. आता त्यांच्यावर अटकेचा धोका निर्माण झाला आहे. पंजाब पोलिसांच्या एका पथकाने संदीप पाठक यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी भेट दिली होती, परंतु अधिकारी पोहोचण्यापूर्वीच ते निघून गेले. दरम्यान, पंजाब प्रदूषण नियंत्रण मंडळाने पंजाबचे राज्यसभा खासदार राजिंदर गुप्ता यांच्या मालकीच्या ट्रायडेंट ग्रुपच्या कारखान्यावर छापा टाकला होता. कारखाना आणि आवश्यक कागदपत्रांची कसून तपासणी करण्यात आली. ही कारवाई कोणतीही पूर्वसूचना न देता करण्यात आली. हा छापा राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप होत आहे.

Sandeep Pathak
HSC Result 2026 : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर; 'या' वेबसाईटवर पाहा तुमचे गुण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com