हस्तिनापूरचे रहिवासी सुमित यांचा मृतदेह मावाना पोलीस ठाण्यात ठेवून गोंधळ घातल्या प्रकरणी पोलिसांनी भाजप नेते रवी गोला यांच्यासह पाच 70 ते 80 अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. तसेच त्यांना अटक करण्यात येईल असेही पोलिसांनी म्हटले आहे. हस्तिनापुर येथील सुमित आणि शुभम पाल रविवारी संध्याकाळी आपला मोबाईल दुरुस्त करण्यासाठी बाईकवरून मावनाकडे जात होते. कालवा ओलांडून बामणी मंदिराजवळ पोहोचल्यावर एका अपघातात ते गंभीर जखमी झाले.
पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दोन्ही जखमीना रुग्णवाहिकेकडे मेरठच्या रुग्णालयात पाठवले, तसेच अपघातग्रस्त बाईक जप्त केली. मेरठला नेत असताना वाटेतच सुमितचा मृत्यू झाला. पोस्टमार्टमनंतर सुमितच्या कुटुंबीयांनी सोमवारी दुपारी 4.15 च्या सुमारास त्याचा मृतदेह पोलीस ठाण्यात आणला. मृतदेह पोलीस स्टेशनला आणल्यानंतर मोठा गोंधळ घातला. सुमितचा मृत्यू नीलगायमुळे नाही तर रोडवर उभी असलेल्या बसमुळे झाली. पोलीस अधिकारी पंकज लवानिया यांनी हस्तक्षेप केल्यानंतर हे प्रकरण मिटले.
यानंतर इन्स्पेक्टर पवन कुमार यांनी मावाना पोलीस ठाण्यात जगबीर सिंग, अमर सिंग, भाजपचे नेते रवी गोला, प्रदीप कुमार, सर्वेश कुमार यांच्यासह 70 ते 80 लोकांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. त्यात म्हटले आहे की, सुमितच्या कुटुंबीयांनी आणि इतरांनी त्याचा मृतदेह पोलीस स्टेशनच्या परिसरात ठेवून मोठा गोंधला घातला. तसेच पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. पोलिसांना शिवीगाळ आणि धक्काबुकी केल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच त्यांना लवकरच अटक होणार आहे असे ही पोलिसांनी म्हटले आहे. या प्रकरणामुळे उत्तरप्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.