Delhi High Court: हायकोर्टात सुनावणीवेळी सुरू झाला अश्लिल व्हिडिओ, न्यायाधीशांसह सगळ्यांनाच बसला धक्का

Obscene Video Plays During Online Hearing In Delhi High Court: दिल्ली हायकोर्टात सुनावणी सुरू असताना अचानक अश्लिल व्हिडिओ सुरू झाला यामुळे एकच गोंधळ उडाला. एक-दोन नाही तर अनेक वेळा हा व्हिडीओ सुरू झाला.
Delhi High Court: हायकोर्टात सुनावणीवेळी सुरू झाला अश्लिल व्हिडिओ, न्यायाधीशांसह सगळ्यांनाच बसला धक्का
Delhi High CourtSaam tv
Published On

Summary -

  • दिल्ली हायकोर्टात ऑनलाइन सुनावणीदरम्यान धक्कादायक घटना घडली

  • सुनावणीदरम्यान अश्लिल व्हिडिओ प्ले झाला

  • या प्रकारानंतर सुनावणी थांबवण्यात आली

  • या प्रकरणाचा दिल्ली पोलिसांकडून तपास सुरू आहे

दिल्ली हायकोर्टात आज सुनावणीदरम्यान एक हैराण करून टाकणारी घटना घडली. सरन्यायाधीश डी. के उपाध्याय यांच्यासमोर ऑनलाइन सुनावणी सुरू असताना अचानक अश्लिल व्हिडिओ सुरू झाला. हा व्हिडिओ एकदा-दोनदा नाही तर अनेक वेळा प्ले झाला. या प्रकारामुळे दिल्ली हायकोर्टात सुनावणीसाठी उपस्थित असलेल्या सर्वांना धक्का बसला. या घटनेची सध्या चांगलीच चर्चा होऊ लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा संपूर्ण प्रकार ऑनलाइन सुनावणीदरम्यान घडला. हे अश्लील व्हिडिओ कंटेट युजर श्रीधर सरनोबत आणि शीतजीत सिंह यांच्या आकाऊंटवरून सुरू झाले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र हे जाणूनबुजून करण्यात आले होते की तांत्रिक बिघाड होता हे अद्याप स्पष्ट झाले नाही. सतत अश्लिल व्हिडिओ प्ले होत असल्यामुळे लगेचच ऑनलाइन सुनावणी थांबवण्यात आली. या प्रकारामुळे न्यायाधिश आणि इतर सर्वजण चकीत झाले. नेमका काय प्रकार सुरू आहे हे कुणालाच कळत नव्हते.

Delhi High Court: हायकोर्टात सुनावणीवेळी सुरू झाला अश्लिल व्हिडिओ, न्यायाधीशांसह सगळ्यांनाच बसला धक्का
Bombay High Court verdict: फी भरली नाही म्हणून शाळेतूल काढता येणार नाही, कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

काही मिनिटांनंतर ऑनलाइन सुनावणीसाठी व्हिसी सिस्टम पुन्हा सुरू करण्यात आली तेव्हा परत अश्लील व्हिडिओ सुरू झाला. बॅकग्राऊंडला ऑटोमॅटिक एक व्हाइस मेसेज ऐकू येत होता. 'हे अमेरिकेतून केलेले हॅक आहे. मिटिंगला आता बंद करा. पुन्हा कधी याला सुरू करू नका. कारण हॅक केले गेले आहे.', हे ऐकायला मिळत होते. या घटनेनंतर कोर्ट प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. ही घटना कशी घडली आणि याला जबाबदार कोण आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Delhi High Court: हायकोर्टात सुनावणीवेळी सुरू झाला अश्लिल व्हिडिओ, न्यायाधीशांसह सगळ्यांनाच बसला धक्का
Mumbai High Court: ऑफिसमध्ये महिला सहकाऱ्याच्या स्तनांकडे एकटक बघणे गुन्हा नाही, मुंबई हायकोर्टाने काय दिला निकाल?

दिल्ली हायकोर्टाकडून सुनावणीदरम्यान अश्लील व्हिडिओ सुरू झाल्याप्रकरणी कारवाई केली जात आहे. याप्रकरणी दिल्ली हायकोर्टाने दिल्ली पोलिसांच्या आयएफएसओ युनिटकडे तक्रार दिली आहे. आयएफएसओ युनिट या संपूर्ण प्रकाराचा कसून तपास करत आहेत. या घटनेमुळे हायकोर्टात होणाऱ्या ऑनलाइन सुनावणीच्या सुरक्षा नियमावलीवर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ऑनलाइन सुनावणीदरम्यान झालेल्या निष्काळजीपणाबद्दल तपास करून संबंधित आरोपीविरोधात कठोर करावाई केली जाणार आहे.

Delhi High Court: हायकोर्टात सुनावणीवेळी सुरू झाला अश्लिल व्हिडिओ, न्यायाधीशांसह सगळ्यांनाच बसला धक्का
Mumbai High Court: विवाहित महिलेच्या मृत्यूनंतर मालमत्ता कोणाला मिळते? कोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com