Court Marriage Document: कोर्ट मॅरेज करताना कोणती कागदपत्रे आवश्यक असतात? जाणून घ्या संपूर्ण यादी

Shruti Vilas Kadam

वयाचा पुरावा (Age Proof Documents)

वरासाठी किमान २१ वर्षे आणि वधूसाठी किमान १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, शाळेचे प्रमाणपत्र किंवा पासपोर्ट चालतो.

Court Marriage Document | Saam Tv

ओळखपत्र (Identity Proof)

दोघांचेही वैध ओळखपत्र आवश्यक असते. आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स मान्य असते.

Court Marriage Document | Saam Tv

राहत्या घराचा पत्ता (Address Proof)

कोर्ट मॅरेज ज्या जिल्ह्यात करायचा आहे, त्या जिल्ह्यात किमान ३० दिवस राहिल्याचा पुरावा द्यावा लागतो.रेशन कार्ड, लाईट बिल, भाडेकरार, आधार कार्ड उपयोगी ठरते.

Court Marriage Document | Saam Tv

फोटो (Passport Size Photographs)

वर-वधूचे ६ ते ८ पासपोर्ट साईज फोटो आवश्यक असतात. काही ठिकाणी संयुक्त फोटोही मागितला जातो.

Court Marriage Document | Saam Tv

अविवाहित असल्याचा दाखला / प्रतिज्ञापत्र (Affidavit)

दोघेही अविवाहित असल्याचे किंवा घटस्फोटीत/विधवा-विधुर असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते.

Court Marriage Document | Saam Tv

साक्षीदारांची कागदपत्रे (Witness Documents)

किमान ३ साक्षीदार आवश्यक असतात. साक्षीदारांचे आधार कार्ड, फोटो आणि पत्ता द्यावा लागतो.

Court Marriage Document | Saam Tv

धर्म किंवा राष्ट्रीयत्व संबंधित कागदपत्रे (जर आवश्यक असतील तर)

धर्म वेगळा असल्यास किंवा परदेशी नागरिक असल्यास अतिरिक्त कागदपत्रांची मागणी केली जाऊ शकते.

Court Marriage Document | Saam Tv

Cotton Kurta Sets: उन्हाळ्यासाठी ट्राय करा कॉटनचे हे 7 ट्रेंडी कुर्ता सेट्स; मिळेल कम्फर्टेबल आणि सुंदर लूक

Cotton Kurta Sets | Saam Tv
येथे क्लिक करा