इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरून तुफान चर्चा; नितीन गडकरींची बदनामी केल्याप्रकरणी ४ प्रसिद्ध एन्फ्ल्यूएन्सर कोण? कोणावर गुन्हा दाखल

FIR Against Influencers For Ethanol Petrol Misinformation: इथेनॉल मिश्रित पेट्रोलबाबत दिशाभूल करणारे दावे आणि नितीन गडकरी यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी नागपूर सायबर पोलिसांनी 4 सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Nagpur Cyber Police files FIR against four social media influencers over misleading and defamatory content on ethanol fuel policy targeting Nitin Gadkari.
Nagpur Cyber Police files FIR against four social media influencers over misleading and defamatory content on ethanol fuel policy targeting Nitin Gadkari.saam tv
Published On

इथेनॉल मिश्रित पेट्रोल (E20) धोरणाबाबत सोशल मीडियावर दिशाभूल करणारी माहिती पसरवणे आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची प्रतिमा मलिन करणे चार सोशल मीडिया कंटेट क्रिएटर्सना महागात पडले आहे. या प्रकरणी नागपूर सायबर पोलिसांनी चार नामांकित इन्फ्लुएन्सर्सविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. भाजपच्या सोशल मीडिया सेल प्रमुखांनी दिलेल्या तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी ही कायदेशीर कारवाई केली आहे.

तक्रारीनुसार, संबंधित क्रिएटर्सनी त्यांच्या यूट्यूब आणि इन्स्टाग्राम व्हिडिओंमध्ये केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरणावर आक्षेपार्ह भाष्य केले होते.

दिशाभूल करणारे दावे: या व्हिडिओंमध्ये इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचे मोठे नुकसान होते, असे चुकीचे आणि तांत्रिकदृष्ट्या दिशाभूल करणारे दावे करण्यात आले.

बदनामीकारक भाषा: काही व्हिडिओंमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात आक्षेपार्ह, मानहानीकारक आणि अपमानास्पद भाषेचा वापर करण्यात आल्याचा आरोपही तक्रारीत आहे.

Nagpur Cyber Police files FIR against four social media influencers over misleading and defamatory content on ethanol fuel policy targeting Nitin Gadkari.
Railway Booking : रेल्वेचा मोठा निर्णय! १५ मिनिटे आधीही बुक करता येणार कन्फर्म तिकीट; वाचा A to Z माहिती

या क्रिएटर्सवर झाली कारवाई

नागपूर सायबर पोलिसांनी प्राथमिक चौकशीमध्ये आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणाऱ्या कंटेंटचे पुरावे आढळल्यानंतर खालील चार सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सवर गुन्हा दाखल केला आहे:

1. मनीष कश्यप

2. देसी बोयसार (Desi Boysar)

3. हर्षित राठी

4. अंकलेश इनवटे

Nagpur Cyber Police files FIR against four social media influencers over misleading and defamatory content on ethanol fuel policy targeting Nitin Gadkari.
High Court : महिलेची सलवार काढणे अन् छातीला स्पर्श करणे बलात्काराचा प्रयत्न नाही; हायकोर्टाची टिप्पणी

सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरील त्या वादग्रस्त कंटेंटची प्राथमिक तपासणी करण्यात आली असून, त्यात तथ्य आढळल्याने गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सायबर सेल करत आहे. इथेनॉल पेट्रोलच्या वाढत्या वापराच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अनेक दावे-प्रतिदावे केले जात असतानाच, आता थेट कायदेशीर कारवाई झाल्याने सोशल मीडिया वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com