

दिल्लीतील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरवर बलात्कार
व्हिडीओ शूटच्या बहाण्याने हॉटेलमध्ये नेत केलं भयंकर कृत्य
बलात्कारानंतर ब्लॅकमेल आणि धर्मांतरासाठी दबाव
पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू
दिल्लीमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. व्हिडीओ शूट करण्याच्या बहाण्याने तिला एका हॉटेलवर नेलं. त्याठिकाणी आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी मंगळवारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे दिल्ली हादरली. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील बुराडी परिसरात ही घटना घडली. बुराडी येथील रहिवासी असलेल्या ३६ वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरवर हॉटेलमध्ये नेऊन बलात्कार करण्यात आला. बलात्कारानंतर आरोपीने भाऊ आणि मेहुण्याच्या मदतीने पीडितेवर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला. पीडितेने या प्रकरणी बुराडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
पीडितेने ११ ने रोजी पोलिस मुख्यालयात तक्रार दाखल केली. तिने केलेल्या तक्रारीनुसार, ३६ वर्षीय पीडिता बुराडी येथे नवरा आणि १५ वर्षांच्या मुलीसोबत राहते. ती एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून घरातच व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर अपलोड करते. २०२२ मध्ये सनी नावाच्या एका व्यक्तीने इन्स्टाग्रामद्वारे तिच्याशी संपर्क साधला होता.
२०२२ मध्ये सनी तिला भेटण्यासाठी बुराडीला आला होता. त्याने तिला रील शूटिंग करण्याच्या बहाण्याने एका हॉटेलमध्ये नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. दरम्यान, पीडितेला समजले की, आरोपीचे नाव शकीब झरदारी असून तो अमरोहाचा रहिवासी आहे. त्यानंतर पीडितेने आरोपीपासून स्वत:ला दूर करण्यास सुरूवात केली.
शाकिबपासून दूर झाल्यानंतर त्याचा भाऊ आणि मेहुण्याने तिला फोन करायला सुरूवात केली. त्यांनी तिच्या नवऱ्याच्या मोबाईलवर व्हिडीओ पाठवण्याची धमकी दिली आणि तिला बुराडी येथील एका मदरशात भेटायला बोलावले. मदरशातील एका हाफिजने धर्मांतर केल्यानंतर त्यांना ५.५० लाख रुपये देण्याचे वचन दिले. पीडितेने धर्मांतरासाठी नकार दिला. त्यानंतर २०२३ मध्ये तिन्ही आरोपींनी महिला आणि तिच्या मुलीवर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकण्यास सुरूवात केली. त्यानंतर पीडितेने ही बाब नवऱ्याला सांगितली.
वाद वाढल्यानंतर पीडिता जवळपास ३ वर्षे आरोपीपासून दूर राहिली. परंतु आरोपी तिला भेटत राहिला आणि तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकत राहिला. त्यानंतर या वर्षी ५ मे रोजी आरोपीने पीडितेच्या नवऱ्याच्या मोबाईलवर एक आक्षेपार्ह पोस्ट पाठवली. यानंतर तिच्या नवऱ्याने तिला घरातून हाकलून दिले. त्यानंतर पीडितेने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. ज्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.