Accident : महाकुंभात पवित्र स्नान करून परतताना काळाचा घाला, बाप-लेकीचा मृत्यू, १० गंभीर

Uttar Pradesh Unnao Accident News : महाकुंभात पवित्र स्नान करून परतणाऱ्या भक्तांच्या जीपचा भीषण अपघात झालाय. यामध्ये बाप-लेकीचा मृत्यू झाला, तर १० जण जखमी झाले आहेत.
Unnao News
Unnao News
Published On

Unnao Accident News : प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभात पवित्र स्नान करून परतणाऱ्या भक्तांवर काळाने घाला घातलाय. भाविकांच्या जीपने बसला जोरदार धडक दिल्यामुळे भीषण अपघात झालाय. यामध्ये बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला, तर १० जण जखमी झाले आहेत. यामधील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. कानपूर-लखनौ महामार्गावर अजगैन परिसरात आज सकाळी साडेसहा वाजता हा अपघात झाला.

कानपूर-लखनौ महामार्गावर अजगैन परिसरात आज सकाळी जीप आणि बसचा भीषण अपघात झाला. भाविक महाकुंभात पवित्र स्नान करून घराकडे परत निघाले होते, त्यावेळी काळाने घाला घातला. या भीषण अपघातामध्ये बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला. तर १० जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर महामार्गावर खळबळ उडाली होती. घटनास्थळी अर्ध्या तासानंतर पोलीस पोहचले, त्यानंतर जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी तात्काळ जीपमध्ये अडकेलल्या भाविकांना बाहेर काढले अन् रूग्णालयात दाखल केले. चालकाला गाडी चालवाताना डोळा लागल्यामुळे अपघात झाला असेल, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय.

Unnao News
School Bus Accident : मोठी दुर्घटना! ४० मुलांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात

मध्य प्रदेशमधील ईशागड आणि शिवपूरी येथील १२ भाविक मार्शल जीपमधून एक फेब्रुवारी रोजी महाकुंभात पोहचले होते. महाकुंभामध्ये पवित्र स्नान, इतर विधी केल्यानंतर आज ते निघाले होते. महाकुंभानंतर ते काशी विश्वनाथ आणि अयोध्यामध्ये राम लल्लाचे दर्शन करून चित्रकूटला परतणार होते. पण अजगैनजवळ चमरौली गावाजवळ काळाने घाला घातला. जीपला बसने जोरदार धडक दिली. यामध्ये ५५ वर्षीय सुरेश तिवारी आणि त्यांची ३० वर्षीय मुलगी राधा व्यास यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये दहा जण जखमी झाले आहेत. सर्वांना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. यामधील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येतेय. अपघातग्रस्त वाहने महामार्गावरून हटवण्यात आली आहेत, आता वाहतूक सूरळीत झालेय.

Unnao News
Accident : नाशिक-सूरत महामार्गावर भीषण अपघात, बस 200 फूट दरीत कोसळली, ७ जण जागीच ठार, १५ जणांची प्रकृती गंभीर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com