प्रसिद्ध न्यूरोसर्जनचे अपघाती निधन; महामार्गावर कारचा कोळसा

Doctor Burnt Alive In Car After Fatal Accident: खम्ममहून हैदराबादकडे जात असताना न्यूरोसर्जन डॉ. जगदीश बाबू यांच्या कारला भीषण अपघात झाला. दुभाजकाला धडकल्यानंतर कारने पेट घेतल्याने त्यांचा मृत्यू झाला.
FAMOUS NEUROSURGEON DIES IN HORRIFIC CAR ACCIDENT ON NH 365BB
FAMOUS NEUROSURGEON DIES IN HORRIFIC CAR ACCIDENT ON NH 365BBsaam tv
Published On

हैदराबाद: खम्मामहून हैदराबादकडे जात असताना एका न्यूरोसर्जन डॉक्टरच्या कारला भीषण अपघात झाला. कार रस्त्याच्या दुभाजकाला धडकून पेट घेतल्याने डॉक्टरचा कारमध्येच जळून मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना रविवारी सकाळी सूर्यापेट जिल्ह्यातील पिल्ललामरी परिसरात NH 365BB महामार्गावर घडली.

FAMOUS NEUROSURGEON DIES IN HORRIFIC CAR ACCIDENT ON NH 365BB
Accident : पहाटे महामार्गावर भीषण थरार! ४३ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा भयानक अपघात; ६ जणांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ.के. जगदीश बाबू हे रविवारी सकाळी सुमारे 7.15 वाजता खम्मामहून हैदराबादमध्ये वास्तव्यास आहे. प्रवासादरम्यान त्यांच्या कारचे नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या दुभाजकला धडकली. त्यानंतर काही क्षणातच कारने पेट घेतला. खम्मम ग्रामीण पोलीस ठाण्याचे सीआय जी. राजशेखर यांनी दिलेल्या माहितीनुसार, झोप पूर्ण न झाल्यामुळे डॉक्टरांचा कारवरील ताबा सुटला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दुभाजकाला धडकल्यानंतर कारने पेट घेतला आणि काही मिनिटांतच संपूर्ण कार जळून खाक झाली. या दुर्घटनेत डॉक्टरांचा कारमध्येच होरपळून मृत्यू झाला.

FAMOUS NEUROSURGEON DIES IN HORRIFIC CAR ACCIDENT ON NH 365BB
Road accident: महामार्गावर रात्री भीषण अपघात! उभ्या लॉरीवर कार आदळून ८ इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला. मात्र कार पूर्णपणे जळाल्यामुळे मृतदेहाची ओळख पटवण्यात सुरुवातील पोलिसांनी अडचणी आल्या. त्यानंतर मृत व्यक्तीची ओळख डॉ. जगदीश बाबू अशी पटली. डॉ.जगदीश बाबू हे खम्मम येथील एका खासगी महाविद्यालयातील न्यूरोसर्जरी विभागाचे प्रमुख होते. तसेच ते खम्मममधील एका रुग्णालयात न्यूरोसर्जन म्हणून कार्यरत होते. अपघाताची माहिती मिळताच सूर्यापेट येथील काही डॉक्टरही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तो सूर्यापेट शासकीय जनरल रुग्णालयात पोस्टमार्टम पाठवला आहे.

FAMOUS NEUROSURGEON DIES IN HORRIFIC CAR ACCIDENT ON NH 365BB
Accident : पहाटे महामार्गावर भीषण थरार! ४३ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा भयानक अपघात; ६ जणांचा मृत्यू

या अपघातामागील नेमके कारण काय होते, याचा पोलीस तपास करत असून घटनेशी संबंधित अधिक माहिती आणि पुरावे गोळा केले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com