Fack Check : केंद्र सरकारची नवी योजना, रेशन कार्डधारकांना मिळणार मोफत मोबाईल?

free mobile scheme India truth : रेशनकार्ड धारकांना मोफत मोबाईल मिळणार असल्याचा व्हायरल दावा खोटा ठरला आहे. पीआयबी फॅक्ट चेकनुसार हा व्हिडिओ AI निर्मित असून सरकारने अशी कोणतीही योजना जाहीर केलेली नाही.
free mobile scheme India truth
free mobile scheme India truth Saam TV marathi
Published On

संदीप चव्हाण

Ration card news : आम्ही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो. आता दावा करण्यात आलाय की रेशनकार्ड धारकांना मोफत मोबाईल मिळणार आहे...पण, खरंच या दाव्यात तथ्य आहे का...? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

...यातला व्हिडिओ बघा, स्वत:च पंतप्रधान मोदी आता रेशनकार्डवर महागडा मोबाईल मोफत मिळणार असल्याची घोषणा करतायत...या व्हिडिओत ते सांगतायत की, ज्यांच्या घरी सरकारी नोकरदार नाही, ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात...हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय...प्रत्येकाकडे रेशन कार्ड आहे, त्यामुळे खरंच मोबाईल मोफत मिळणार आहे का...? मोफत मोबाईल मिळवण्यासाठी काय कागदपत्रं लागणार...? याची आम्ही पडताळणी सुरू केली..

free mobile scheme India truth
Ladki Bahin Yojana : मे महिन्यापासून 'या' लाडक्या बहि‍णींचा लाभ बंद, तुमचं नाव तर नाही ना?

रेशनकार्ड असलेल्यांसाठी मोबाईल मोफत मिळणार असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली...प्रत्येकाकडे सध्या रेशनकार्ड आहे...त्यामुळे याची सत्यता जाणून घेऊन ती सांगणं गरजेचं आहे...हा व्हिडिओ मुबीन स्पीक्स नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आलाय...त्यामुळे आम्ही मोदींनी ही घोषणा कुठे केली...? तसेच काही रेशन दुकानदारांकडूनही याबाबत माहिती मिळवली...

हा व्हिडिओ पाहून अनेकांनी विश्वास ठेवला असेल...कारण, व्हिडिओच असा बनवलाय की तो कुणीही पाहिला तरी खराच वाटेल...मात्र, जेव्हा सरकारी एजन्सी 'पीआयबी फॅक्ट चेक'ने याबाबत माहिती दिली...त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

free mobile scheme India truth
IAS transfers : महाराष्ट्राच्या प्रशासनात 'बदली' वारे; आणखी ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या, कुणाची कुठे पोस्टिंग?

व्हायरल सत्य

साम इन्व्हिस्टिगेशन - काय सत्य समोर आलं?

रेशन कार्डधारकांना मोफत मोबाईलची घोषणा नाही

मोदींनी अशी कोणतीही घोषणा केलेली नाही

पंतप्रधान मोदींचा व्हायरल व्हिडिओ AI निर्मित

व्हिडिओ व्हायरल करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न

जोपर्यंत सरकारकडून अधिकृत माहिती मिळत नाही, तोपर्यंत सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या कोणत्याही आकर्षक योजनांवर विश्वास ठेवू नये... केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही योजनेबद्दल अधिकृत माहिती http://myscheme.gov.in या वेबसाईटवर मिळते...त्यामुळे अशा सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडिओंवर विश्वास ठेवू नका...आमच्या पडताळणीत रेशनकार्डधारकांना मोफत मोबाईल मिळणार असल्याचा दावा असत्य ठरलाय...

ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही

free mobile scheme India truth
Ladki Bahin Yojana : मे महिन्यापासून 'या' लाडक्या बहि‍णींचा लाभ बंद, तुमचं नाव तर नाही ना?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com