भाजप कार्यकर्त्याच्या घरावर बॉम्ब फोडला, आवाजाने परिसर हादरला; बचाव पथक मदतीला धावलं

bjp Latest news : केरळमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरावर बॉम्ब फोडल्याची घटना घडली आहे. बॉम्बच्या आवाजाने परिसर हादरल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली.
pune news update
political news Saam tv
Published On
Summary

केरळच्या कन्नूरमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरावर स्फोट

अज्ञात व्यक्तीकडून भाजप कार्यकर्त्याच्या घरावर बॉम्ब फेकल्याची घटना

केरळच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढला तणाव

केरळमध्ये विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नेत्यांच्या राजकीय वक्तव्यामुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. निवडणुकीच्या धामधुमीदरम्यान भाजप कार्यकर्त्याच्या बॉम्ब फेकल्याची घटना घडली आहे. केरळमधील कन्नूरच्या काथिरूरमधील भाजप कार्यकर्त्यावर बॉम्ब फेकल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काथिरूरच्या कोकांची भागात मजीशा पथायाकुन्नु या भाजप कार्यकर्त्याच्या घरावर बॉम्ब फेकला. प्राथमिक माहितीनुसार, भाजप कार्यकर्त्याच्या घरावर रविवारी रात्री साडेआठ वाजता अज्ञात व्यक्ती हा भाजप कार्यकर्ते मजीशा यांच्या घराजवळ पोहोचला. त्यानंतर शिवीगाळ केली. यानंतर त्याने भाजप कार्यकर्त्याच्या घरावर बॉम्ब फेकला. बॉम्ब फुटल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

pune news update
भाजप नेत्याच्या छळाला कंटाळून वृद्ध व्यक्तीने संपवले जीवन; नागरिकांमध्ये संतापाची लाट

काथिरूर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'मजीशा यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. फॉरेन्सिक पथक स्फोटकाचा तपास करत आहे. अज्ञात व्यक्तीने नेमकं फटाका फोडला की देशी बॉम्ब फोडला, याचा तपास केला जात आहे.

केरळमध्ये विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. निवडणूक आयोगाच्या जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, केरळामधील १४० जागांसाठी ९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. केरळमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल ४ मे रोजी जाहीर होणार आहे.

pune news update
कॅप्टन खरात महिलांचं शोषण करणारा भोंदूबाबा; महिला अत्याचाराचे 58 व्हिडीओ समोर?

भाजप कार्यकर्त्याच्या घरावर बॉम्ब फोडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेचा भाजप कार्यकर्त्यांकडून निषेध केला जात आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर साऱ्यांचं लक्ष आता पोलिसांच्या कारवाईकडे लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com