

निसर्गाचं तांडव आणि जगभरात एकापाठोपाठ एक येणाऱ्या महाभयंकर आपत्ती.. कधी नेपाळमध्ये आलेला विनाशकारी महापूर, तर कधी जपान आणि व्हेनेझुएलाला हादरवून सोडणारा भूकंप. तर दुसरीकडे शहरंच्या शहरं संपवणारे जंगलांमध्ये पेटलेले भयंकर वणवे. नेपाळमध्ये निसर्गाचं हे रौद्ररूप पाहिल्यानंतर हा एका हवामान बदलाचा इशारा नाही, तर ही संपूर्ण मानवजात आणि पृथ्वीच संपण्याची सुरुवात आहे का? असा प्रश्न आता उपस्थित झालाय. कारण, तंत्रज्ञानातील तज्ञ एलॉन मस्कनं एक मोठा दावा केला आणि जगाला मोठ्या धोक्याचा इशारा दिलाय. तो नेमकं काय म्हणाला पाहा
पृथ्वीवर दर १० कोटी वर्षांनी विनाशाची मोठी घटना घडते आणि वाढत्या हवामान बदलामुळे मानवाकडे पृथ्वी वाचवण्यासाठी आता फक्त ५० वर्षांचा काळ उरला आहे. सध्याचे सौर आणि पवन ऊर्जेसारखे जमिनीवरचे प्रयत्न या विनाशाचा धोका रोखण्यासाठी अत्यंत अपुरे आहेत. वेळीच कडक पावलं न उचलल्यास किनारपट्टीची शहरं आणि संपूर्ण मानवाचं अस्तित्वच धोक्यात येईल.
आणि तंत्रज्ञानातला बादशाह आहे. त्यानं अंतराळात स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं, अन् संशोधनाच्या जोरावर विज्ञानाला अशा शिखरावर पोहचवलं की नासालाही त्याची मदत घ्यावी लागली. मस्कच्या मते, जर आपल्याला समुद्रकिनारी असलेली शहरं आणि आपली पुढची पिढी वाचवायची असेल, तर केवळ सस्टेनेबल एनर्जीच्या म्हणजेच शाश्वत ऊर्जेच्या गप्पा मारून चालणार नाही. तर आपल्याला अंतराळात जाऊन पृथ्वीचे रक्षण करावे लागेल त्यासाठी त्यानं काय प्लॅन सांगितला तो पाहा
तापमान रोखण्याचा अत्यंत संथ मार्ग
फक्त प्रदूषण कमी करणं हे जमिनीवरचे अपुरे प्रयत्न
सस्टेनेबल एनर्जीद्वारे वेळेचा अपव्यय होऊन परिणाम दिसायला उशीर
तात्पुरता दिलासा मिळून संरक्षणासाठी मर्यादा संरक्षण
स्मार्ट सॅटेलाईट पॅटर्ननं थेट सूर्य किरणांवर ताबा घेता येईल.
अंतराळातून थेट टेम्परेचर कंट्रोल करत जिओ इंजिनिअरिंगची गरज
तातडीने स्पेस मोड ऑन करुन येणाऱ्या 50 वर्षांत परिणाम दिसेल
ग्लोबल वॉर्मिंगचा कायमचा द एंड करुन 1 अब्ज वर्षांची गॅरंटी मिळेल
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.