
मध्य प्रदेश : मध्य प्रदेशच्या रतलाम जिल्ह्यात रविवारी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. रतलाम जिल्ह्यात घराला आग लागून ११ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रविवारी मध्यरात्री ही दुर्दैवी घटना घडली. ई-बाईकचा स्फोट होऊन घराला भीषण आग लागली. आग लागल्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांनी उडी मारून जीव वाचवला. मात्र, या दुर्घटनेत कुटुंबातील ११ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी घरात कुटुंबातील सदस्य २ वर्षीय मुलीचा वाढदिवस साजरा करत होते. या वाढदिवसानिमित्त अनेक नातेवाईक बडौदाच्या रतलाम येथे आले होते. याचदिवशी घराला आग लागल्याची घटना घडली. या आगीत एक ज्येष्ठ व्यक्ती आणि एका लहान मुलीचा हात भाजला. रात्रीच्या दीड वाजता आग लागल्याची घटना घडली. आगीत भाजल्यानंतर दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. या आगीत घर जळून खाक झालं.
रतलाममधील वॉर्ड नंबर २ च्या लक्ष्मणपुरा पी अँड टी कॉलनीत भगवती मोर्य यांचं घर आहे. रात्री दीड वाजता चार्जिंगला लावलेल्या बाईकचा स्फोट झाला. घरातील लोक झोपलेले असताना ही भीषण दुर्घटना घडली. रात्रीचा अंधार आणि धुरामुळे कोणाला काहीच समजलं नाही. आग लागल्यानंतर घरातील लोकांनी पळ काढला. स्फोटाच्या तीव्र आवाजाने आजूबाजूच्या लोकांची झोप उडाली. आग लागल्यानंतर इतर लोक मदतीला धावले. शेजारी राहणाऱ्या लोकांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं.
या दुर्घटनेत ११ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. अंतरा असे मृत मुलीचे नाव आहे. ती तिच्या आईसोबत आजोबांच्या घरी बडोदरा येथे आली होती. या दुर्घटनेत नाना भगवती आणि १२ वर्षीय मावस बहीण लावण्या होरपळली. रुग्णालयात उपचार सुरु असताना अंतराने जीव सोडला. अंतराच्या निधनाने तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.