EVM Machine: मोठी बातमी! ईव्हीएम मशीनमध्ये महत्वाचा बदल, बिहार निवडणुकीपासून होणार सुरूवात
EVM MachineSaam tv

EVM Machine: मोठी बातमी! ईव्हीएम मशीनमध्ये महत्वाचा बदल, बिहार निवडणुकीपासून होणार सुरूवात

Eletion Commission Of India: निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. ईव्हीएम मशीनमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. यापुढे ईव्हीएन मशीनवर उमेदवाराचे नाव आणि चिन्हासोबत कलर फोटो देखील लावण्यात येणार आहे.
Published on

Summary -

  • ईव्हीएम मशीनमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.

  • निवडणूक आयोगाने आज मोठी घोषणा केली.

  • बिहार निवडणुकीपासून ईव्हीएमवर उमेदवाराचा कलर फोटो लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • एकाच नावाच्या उमेदवारांमुळे मतदार गोंधळून जात असल्याने हा बदल केला जात आहे.

बिहार एसआईआरवरून सुरू असलेल्या वादादरम्यान बुधवारी निवणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. ईव्हीएमवर आता उमेदवाराचे नाव आणि चिन्हासोबत त्याचा कलर फोटो देखील असेल. याची सुरूवात बिहार विधानसभा निवडणुकीपासून होणार आहे. निवडणूक आयोगाने सांगितले की, एकाच नावाच्या उमेदवारांमुळे मतदारांचा अनेकदा गोंधळ उडतो. यामुळेच आता निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराचे नाव आणि चिन्हासोबत कलर फोटो देखील लावण्यात येणार आहे. जेणेकरून मतदारांना त्यांच्या आवडत्या उमेदवाराला योग्यरित्या ओळखता येईल आणि त्यांना मतदान करता येईल.

निवडणूक आयोगाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये असे म्हटले आहे की, उमेदवारांचे कलर फोटो आता ईव्हीएम मतपत्रिकेवर छापले जातील. यामुळे त्यांची ओळख अधिक स्पष्ट होईल. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांचे चेहरे फोटोच्या जागेच्या तीन चतुर्थांश जागा व्यापतील. ज्यामुळे त्यांचे चेहरे अधिक स्फष्ट होतील.'

EVM Machine: मोठी बातमी! ईव्हीएम मशीनमध्ये महत्वाचा बदल, बिहार निवडणुकीपासून होणार सुरूवात
Maharashtra Politics : 'लोकसभेत EVM गारगार वाटायचं'; अजितदादांनी महाविकास आघाडीला डिवचलं

याव्यतिरिक्त, सर्व उमेदवार आणि NOTA अनुक्रमांक ईव्हीएमवर ठळक अक्षरात छापले जातील. त्याचा फॉन्ट आकार ३० असेल. त्याशिवाय सर्व उमेदवारांची नावे आणि NOTA एकाच फॉन्टमध्ये आणि आकारात छापले जातील. जेणेकरून मतदारांना ते वाचणे सोपे होईल. निवडणूक आयोगाने ईव्हीएम मतपत्रिकांसाठी एक मानक वजन देखील निश्चित केले आहे. हे मतपत्रके ७० जीएसएम असतील.

EVM Machine: मोठी बातमी! ईव्हीएम मशीनमध्ये महत्वाचा बदल, बिहार निवडणुकीपासून होणार सुरूवात
EVM चा डेटा डिलीट किंवा रिलोड करू नका; निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

विधानसभा निवडणुकांसाठी विशेष गुलाबी कागद वापरला जाईल. निवडणूक आयोग आगामी बिहार विधानसभा निवडणुकांसह हे बदल लागू करत आहे. त्यानंतरच्या सर्व निवडणुकांमध्ये ही प्रक्रिया वापरली जाईल. बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा पुढील महिन्यात कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे.

EVM Machine: मोठी बातमी! ईव्हीएम मशीनमध्ये महत्वाचा बदल, बिहार निवडणुकीपासून होणार सुरूवात
EVM छेडछाडीसाठी मुंडेंच्या कंपनीतून 10 लाख? अटकेपूर्वी कासलेचा खळबळजनक दावा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com