Election Commission : आगामी निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; IAS, IPS सहित ४७० अधिकाऱ्यांची नियुक्ती

Election Commission News : आगामी निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतलाय. यासाठी IAS, IPS सहित ४७० अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Election Commission  Action On Political Parties
Election Commission Big Action Saam tv
Published On

भारतीय निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणूक आणि काही राज्यातील पोटनिवडणुकीसाठी ४७० केंद्रीय निरीक्षक नियुक्ती करण्यात आले आहेत. त्याची यादी देखील जाहीर करण्यात आले आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. तर ऑक्टोबरमध्ये जम्मू-काश्मीर, राजस्थान, झारखंड, तेलंगणा, पंजाब, मिझोरम आणि ओडिशामध्ये पोटनिवडणुका होणार आहेत. यासाठी विविध राज्यातील कार्यरत असणाऱ्या ४७० अधिकाऱ्यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात ३२० आयएएस, ६० आयपीएस आणि ९० आयआरएस आहेत.

Election Commission  Action On Political Parties
Kalyan Toilet Protest : १२ हजार जणांच्या लोकवस्तीत एकच शौचालय, नागरिकांचं थेट आयुक्तांच्या दालनाबाहेर 'टॉयलेट' आंदोलन

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२५ मध्ये बिहार विधानसभेत २२५ मतदारसंघ आहेत. गुजरातच्या कडी आणि विसावदर, केरळमधील एक सीट, पंजाबमध्ये लुधियाना पश्चिम आणि पश्चिम बंगालमधील कालीगंजमध्ये पोटनिवडणूक होणार आहे.

उत्तर प्रदेशमध्ये गोंडा जिल्ह्यातील कटरा बाजार विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. आमदार बावन सिंह यांच्या निधनानंतर जागा रिक्त झाली आहे. मात्र, तारखेची घोषणा झालेली नाही. जम्मू-काश्मीरमध्ये ४, पंजाबमध्ये एक, आंध्र प्रदेशमध्ये ३, ओडिशा-हरियाणा आणि पश्चिम बंगालमध्ये राज्यभेच्या जागेवर पोटनिवडणूक आहे.

Election Commission  Action On Political Parties
Bareli Protest : बरेलीत नमाजावेळी मोठा गोंधळ, शेकडो आंदोलक रत्यावर उतरले; पोलिसांचा लाठीचार्ज

निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निरीक्षकांचं उमेदवारांच्या निवडणुकीतील खर्चावर लक्ष असणार आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर उमेदवारांना खर्चाचा तपशील द्यावा लागणार आहे. या उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्याचं काम निरीक्षकांना करावं लगणार आहे.

Election Commission  Action On Political Parties
Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

या निवडणुकीदरम्यान निष्पक्ष, विश्वासार्ह आणि पारदर्शक निवडणुका सुनिश्चित करण्याची जबाबदारी या निरीक्षकांची असेल. निरीक्षकांना जबाबदारीचं काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश देण्यात आलेत. तसेच त्यांना कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा करण्यास सांगितलंय. या निवडणुकीदरम्यान कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास त्याची जबाबदारी निरीक्षकांवर असेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com