Kalyan Toilet Protest : १२ हजार जणांच्या लोकवस्तीत एकच शौचालय, नागरिकांचं थेट आयुक्तांच्या दालनाबाहेर 'टॉयलेट' आंदोलन

Kalyan News update : १२ हजार जणांच्या लोकवस्तीत एकच शौचालय असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्रस्त नागरिकांनी थेट आयुक्तांच्या दालनाबाहेर 'टॉयलेट' आंदोलन
kalyan update
Kalyan NewsSaam tv
Published On
Summary

१२ हजार लोकसंख्येसाठी फक्त एकच शौचालय

शौचालय २२ वर्ष जुनं असून केवळ एकच सीट व्यवस्थित

नागरिकांनी संतप्त होऊन आयुक्त कार्यालयात केल ‘टॉयलेट आंदोलन’

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

Kalyan News : कल्याण पूर्व नेतिवली टेकडी परिसरातील महात्मा फुले नगरमध्ये तब्बल दहा ते बारा हजार लोकसंख्या… मात्र स्वच्छतेची परिस्थिती अतिशय भयावह. 20 ते 22 वर्षे जुने शौचालय जवळजवळ कोसळण्याच्या मार्गावर आहे. या शौचालयातही फक्त एकच सीट सुरू… यामुळे महिलांसह लहान मुलांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. अनेकदा पत्रव्यवहार करूनही पालिकेने गांभीर्याने न घेतल्याने अखेर नागरिकांनी टमरेल हाती घेऊन आयुक्तांच्या कार्यालयातच आंदोलन करत थेट ‘टॉयलेट’ करण्याचा प्रयत्न केला.

kalyan update
Marathwada Flood : मायबाप सरकार तुम्हीच सांगा कसं जगायचं? शेतकऱ्याचा आर्त सवाल

कल्याण पूर्व येथील नेतिवली टेकडी परिसरातील महात्मा फुले नगर येथे तब्बल 10 ते 12 हजार लोकसंख्या राहते. एवढ्या प्रचंड लोकसंख्येसाठी केवळ एकच सार्वजनिक शौचालय असून तेही अतिशय जीर्ण अवस्थेत आहे. जवळपास 22 ते 24 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या शौचालयामध्ये तब्बल 12 सीट्स असल्या तरी त्यातील फक्त एकच सीट वापरण्यायोग्य स्थितीत आहे.

पावसाळ्यात या शौचालयाच्या छतामधून मोठ्या प्रमाणावर पाणी गळते. भिंतींवरून मटेरियल गळत असल्याने महिलांचे शौचालय पूर्णपणे बंद आहे. पुरुष मुतारी, दिव्यांगांसाठीचे शौचालय तसेच जाण्याचे रस्ते पूर्णपणे उध्वस्त झाले आहेत. त्यातच वीजपुरवठा बंद असल्याने महिलांना आणि लहान मुलांना अंधारात शौचालय वापरण्याची वेळ येते.

kalyan update
Nandurbar Adivasi Morcha : नंदूरबार का पेटलं? आदिवासी मोर्चाला हिंसक वळण; १४० हून अधिक जण पोलिसांच्या ताब्यात

पाण्याची मोटर बंद असल्याने शौचालयात पाण्याचीही कोणतीही सुविधा नाही. नागरिकांना घरून पाणी घेऊन जावे लागते. इतकेच नव्हे तर शौचालयाचे संपूर्ण बांधकाम झुकले असल्याने ते केव्हाही कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी वारंवार पत्रव्यवहार करूनही डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले.

kalyan update
Akola : अकोल्यातील मंडळ अधिकाऱ्याचा आगाऊपणा; 200 एकर शेत जमीन पाण्याखाली, तहसीलदाराने काय सांगितलं?

अखेर संतप्त कल्याणमधील नागरिकांनी ‘जशास तसे’ आंदोलन केले. यात परिसरात राहणाऱ्या मनोज वाघमारे आणि त्यांच्या आईने दुपारच्या वेळेस अचानक आयुक्त कार्यालयात शिरून ‘टॉयलेट आंदोलन’ करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षा रक्षक व आंदोलकांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला.नागरिकांचे स्पष्ट म्हणणे आहे की शौचालयाची साफसफाई, दुरुस्ती किंवा नवे बांधकाम सुरू करा… अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन उभारले जाईल!” शेवटचा इशारा देत नागरिकांनी महापालिकेला जबाबदार धरले आहे. आता प्रशासन खरोखर जागं होतं का, की पुन्हा एखादं ‘टॉयलेट आंदोलन’ घडतंय, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com